संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर भारताची वाटचाल बळकट व्हावी, महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योग विभागाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’चे पुण्यात आयोजन केले आहे.
संरक्षण उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदानासाठी राज्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो आहे. या माध्यमातून २०० हून अधिक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप व २० हजारांहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येणार आहेत.
एमएसएमई व प्रमुख संरक्षण खरेदी संस्था, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात संवाद सत्रांसोबत प्रख्यात तज्ज्ञांचे नॉलेज सेमिनार, कौशल्य विकास कार्यशाळा, सरकारी सहाय्य उपक्रम, धोरणात्मक भागीदारी, आर्थिक सहाय्य आदींसाठी हा एक मंच आहे.
०००
हे प्रदर्शन राज्याच्या संरक्षण क्षमता बळकट करण्याची शासनाची बांधिलकी अधोरेखित करते. नावीन्य व सहकार्यावर लक्ष केंद्रित करते. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आत्मनिर्भरतेकडे नेणारे, संरक्षण क्षेत्रातील वाढ व नवकल्पनांना चालना देणारे आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#MaharashtraMSMEDefenceExpo
#MSMEDefenceExpo2024
#MSME
#DefenceExpo
#Pune