*चंद्रपूर जिल्हा भाजपा ग्रामीणची कार्यकारिणी जाहीर*

0
59

*चंद्रपूर जिल्हा भाजपा ग्रामीणची कार्यकारिणी जाहीर*

 

*जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली घोषणा*

 

*चंद्रपूर, दि. १६ :* भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर हरीश शर्मा यांनी नवनियुक्त कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये भाजपा जिल्हा ग्रामीण सरचिटणीस,उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. दर तीन वर्षांनी कार्यकारिणीची नव्याने रचना केली जाते. त्यानुसार ही घोषणा करण्यात आलेली आहे.

 

जिल्हा ग्रामीणच्या सरचिटणीसपदी डॉ. मंगेश गुलवाडे, संध्याताई गुरनुले, ब्रीजभूषण पाझारे, राजू गायकवाड, विवेक बोढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नरेंद्र जीवतोडे, सुनील उरकुडे, नंदू रणदिवे, रेणुकाताई दुधे, अजित मंगळगिरीवार, डॉ. भगवान गायकवाड, अरुण मस्की, सतीश धोटे, बबन निकोडे, नारायण हिवरकर, केशव गिरमाजी, सचिन करकाडे, अरविंद भुते, रश्मी पेशने, अविनाश पाल, सुरेश केंद्रे, विनायक देशमुख,समिर केने हे उपाध्यक्ष असतील.

 

सचिवपदी विशाल गज्जलवार, सुनील नामोजवार, वाघुजी गेडाम, माणिक थेरकर, साकेत भानारकर, ज्योतीताई ठाकरे, रोशनी खान, विजय मोकाशी, मधुकर नरड, ओमप्रकाश मांडवकर,रुपेश डोर्लीकर, स्वाती वडपल्लीवार, विनोद चौधरी, कल्पना बोरकर, संजय उपगंनलावार, वंदना सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सिंघवी हे कोषाध्यक्ष असतील.

 

नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल,माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, सुदर्शन निमकर, भाजपा नेते अशोक जीवतोड,भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, रमेश राजूरकर, संजय गजपुरे, नामदेव डाहुले,अनिल डोंगरे,आशिष देवतळे,महेश देवकाते, वंदना शेंडे, गौतम निमगडे, डॉ अंकुश आगलावे, अरुण मडावी, बंडू गौरकार,इमरान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here