सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खूनाची सखोल चौकशी करून दोषी खून्यांवर कठोर कारवाई होणेबाबत.
“माहिती अधिकार महासंघाच्या” वतीने, पुणे, सांगली, ठाणे आणि राज्यातील इतर जिल्हातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व विभागीय आयुक्त यांना भेटून लेखी निवेदन देऊन सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.
*माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन*
*निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना*
*संतोष कदम या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा झालेला निर्घृण खून ही आपल्या सर्वांच्या साठी खूपच धक्कादाय बाब आहे.या प्रकरणात काय योग्य काय अयोग्य आहे अशा गोष्टी आणि या खूनामागील सत्य पोलीस तपासातून लवकरच अधिक स्पष्ट होईलच. परंतु एका कार्यकर्त्यांचा खून होणे ही खूपच चितेंची व काळजी करण्यासारखी व पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे.*
*आज संतोष कदम यांचा खून झाला,उद्या आपल्यापैकी कोणाचाही नंबर लागू शकतो. त्यामुळे संतोष कदम यांचा खून झाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या मनात उठलेला आक्रोश सरकार पर्यंत निवदेनांच्या माध्यमातून पोहचविणे ही प्रत्येक झुंजार कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.प्रत्येक तालुका स्तरावर अध्यक्ष प्रचार प्रमुख किंवा ज्यांना कळकळ आहे अशा कोणत्याही कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.ग्रुपमध्ये चर्चा करावी.निवेदन द्यायला कोण-कोण कोठे व किती वाजता जमणार याची ग्रुपमध्ये चर्चा करून ठरवावे.*
*सोमवार पासून पुढील तीन दिवसांत जास्तीत जास्त निवदेन तहसील व जिल्हाधिकारी कार्यायात द्यावीत.तसेच निवेदन देतानाचा फोटो काढावा. स्थानिक पेपर व सोशल मिडीयातून बातम्या प्रकाशीत कराव्यात.*
*हे आपण प्रसिद्धीसाठी करीत नाही आहोत. तर एक माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या पाठीमागे न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र भर हजारो कार्यकर्ते उभे राहतात हे सत्ताधारी व समाजाला कळाले पाहीजे.*
*सोबत निवेदनांची पीडीएफ दिली आहे. त्यात स्थानिक पत्ता टाकून सदर निवेदन ही जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री,गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना पुढील तीन दिवसांत पाठवायचे आहे.*
*सुभाष बसवेकर*
*अध्यक्ष*
*माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महाराष्ट्र*