वनोजा मंदिरात 13 फेब्रुवारी ला श्री गणेश जन्मोत्सवा निमित्त महाप्रसाद*

0
83

*वनोजा मंदिरात 13 फेब्रुवारी ला श्री गणेश जन्मोत्सवा निमित्त महाप्रसाद*

 

वरोरा : श्री गणेश मंदिर जागृत देवस्थान,वनोजा,हे मंदिर तालुक्यात व जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.या मंदिरात वर्षभर लोकं पूजा पाठ करतात तसेच मनोकामना पूर्ण झाल्यावर भोजन व महाप्रसाद कार्यक्रम करतात.या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येतात. या मंदिरात दरवर्षी श्री गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्मोत्सवाचा कार्यक्रम सर्व भाविकांनी मिळून श्री गणेशमूर्तीचा अभिषेक, होम हवन, धार्मिक अनुष्ठान सकाळी 9 वाजता आयोजित केला आहेत. दुपारी 3 वाजता हजारो भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित केला आहे. यावेळी श्री गणेश मंदिरात 33 वर्षांपासून सेवा देणारे पंडित त्रिशाम बोस व सर्व श्री गणेश मंदिराचे भाविकांनी धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here