चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन व भद्रावती पोलीस स्टेशन ची पिशवी कापून रक्कम लांपास केल्याप्रकरणी चार महिलावर कार्यवाही…….
१) पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक ०६/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल असुन थोडक्यात हकिकत याप्रमाणे की फिर्यादी नामे रमेश नारायणराव बाटवे वय ७९ वर्ष, धंदा सेवानिवृत्त, रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपुर हे पेंशन पगार घेणेकरीता कस्तुरबा रोड चंद्रपुर येथील एस.बि.आय. बँक येथे जाउन 20,000 रू. पेंशन पगार विड्राल करून आपल्या जवळील कापडी थैलीत ठेवले व थोड्या वेळानी थैलीतील पैसे चेक केले असता, थैली कापुन दिसली व थैलित ठेवलेले नगदी रक्कम दिसुन आली नाही. तसेच सौ. मिराबाई वासुदेव गिरडकर रा. पठाणपुरा वार्ड चंद्रपुर यांचेसुध्दा बँकेतुन विड्राल केलेले नगदी रक्कम 10,000 रू. तीचे थैलीला कापुन चोरी केल्याचे दिसले. असे एकुण 30,000 रु. कोणीतरी अज्ञात महिलांनी चोरून नेले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
तसेच
2 ) पोलीस स्टेशन, भद्रावती येथे दिनांक ०६/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल असुन फिर्यादीचे पिशवीतील अशाच प्रकारे चोरी करून 10,000 रू. चोरी नेल्याचे माहिती दिली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद होता
नमुद गुन्ह्याचे गांर्भीय बघता उपविभागीय पोलीस अधिकारी यादव , प्रभारी अधिकारी सपोनि. रमीज मुलानी पो.स्टे. चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपी महिलांचा शोध करीता चंद्रपुर शहर येथील डी.बी पथक मधील सपोनि मंगेश भोंगाळे, पो.उप. नि. शरिफ शेख तसेच डि. बी. कर्मचारी असे पो.स्टे. परिसरात रवाना होवुन गुप्त बातमीदाराच्या व सिसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलेस ताब्यात घेवुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव
1 ) बिजली सिध्दुलाल सिसोदीया वय ३० वर्ष जात सिसोदिया (राजपुत) रा. दुलखेडी ता. नसिंगड जि. राजगड राज्य मध्यप्रदेश
2) भोलीबाई रघुविरसिंह सिसोदीया वय ४० वर्ष जात सिसोदिया (राजपुत)
रा. दुलखेडी ता. नसिंगड जि. राजगड राज्य – मध्यप्रदेश
3) कालीबाई दिलावर सिसोदीया वय ४० वर्ष जात सिसोदिया (राजपुत) रा. कडीया ता. पाचोर जि. राजगड राज्य – मध्यप्रदेश
4) राधिका प्रल्हादसिंह सिसोदीया वय २१ वर्ष जात सिसोदिया (राजपुत) रा. दुलखेडी ता. नसिंगड जि. राजगड राज्य मध्यप्रदेश
असा एकुण ४०,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन , अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु , उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि. रमीज मुलानी , सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि शरिफ शेख, विलास निकोडे,, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, संतोष पंडीत, सचिन बोरकर, , निलेश मुडे, म पो हवा भावना रामटेके, चेतन गज्जलवार, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, मंगेश मालेकर, शाहाबाज सैयद यांनी केलेली आहे. पुढील तपास जयंता चुनारकर करीत आहे.