बेलदार समाजाचा स्नेहमिलन सोहळा संपन्न

0
35

बेलदार समाजाचा स्नेहमिलन सोहळा संपन्न.

वरोरा(प्रती)

 

 

 

स्व.मा.सा. उपाख्य कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे १२४ व्या जयंतीचे औचित्य साधुन बेलदार समाज संघटना, वरोरा तर्फे आयोजित दिनांक २८ जानेवारी २०२४ ला बेलदार समाजाचा स्नेह मिलन सोहळा सिध्दीविनायक मंगल कार्यालय, वरोरा येथे मोठ्या उत्साहात पार पडला, सदर कार्यक्रमांस अध्यक्ष म्हणुन श्रीमती विदयाताई विलास दागमवार, महिला अध्यक्षा, बेलदार समाज संघटना, वरोरा तर उद्घाटक म्हणुन अहेतेश्याम अली, माजी नगराध्यक्ष, न.प. वरोरा तथा उपाध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडी, महाराष्ट्र राज्य, तर प्रमुख्य पाहुणे आनंदराव अंगलवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अ. भा. व्हिजे एनटी, संघ नई दिल्ली, तसेच डॉ. प्रतिक जंगीलवार, डॉ. हर्षद कोमरेड्डीवार, डॉ. मधुरा कोमरेड्डीवार, दिलीव गिद्देवार, अध्यक्ष, बेलदार समाज संघटना, वरोरा, संतोष गुतीवार, तालुका अध्यक्ष, राजु फेथफुलवार कार्याअध्यक्ष, शंकर पारेलवार उपाध्यक्ष, संजय जिलगीलवार सचिव, अजय बालमवार उपाध्यक्ष, सौ. दिपाताई पारेलबार महिला उपाध्यक्षा, अशोक बोम्रतवार कोषाध्यक्ष, हे मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे हस्ते समाज दिनदर्शीकेच विमोचन करण्यात आले.

 

कार्यक्रमाची सुरुवार दिप प्रज्वलन व स्व. मा. सा. उपाख्य कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले, कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरीक सत्कार, गुणवंत विद्यार्थी सत्कार, परदेशात नोकरीवर असलेले समाजातील तरुण वर्गाचा सत्कार तसेच समाजाचे नाव गौरत्वीत केलेले होतकरु मुला मुलीचे सत्कार करण्यात आले, त्यासोबत मोफत रोगनिदान शिबीर व रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचे हळदी कुंकु रांगोळी व चित्रकला स्पर्धा इ. कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमांत लकी ड्रॉ योजना राबविण्यात आली, कार्यक्रमांच्या शेवटी बक्षिस वितरण समारंभ पार पडला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रिकांत अमरशेट्टीवार तर प्रमुख उपस्थिती म्हणुन अशोक गिदेवार गटशिक्षणाधिकारी, पं. स. समुद्रपुर, सुनिल मुत्यालवार, केंद्र प्रमुख पं. स. चंद्रपूर, गजानन गुजेवार, चंद्रशेखर कांचनवार, सौ. जयश्री जिलगीलवार, सौ. संगीता आडेवार, मंचावर उपस्थित होते, पाहुण्याचा हस्ते कार्यक्रमात सहभागी सर्व स्पर्धाकांना बक्षिस वितरण करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे संयुक्त संचालन, सौ. धनश्री ताटेवार, राहुल दागमवार, संतोष गुंतीवार, यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. संगिता आडेवार, यांनी केले, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचयालन सौ. प्रिती सुकंरवार, यांनी केले,

 

कार्यक्रम यशस्वी करण्यास राजुभाउ जिलगीलवार, अमोल ताटेवार, सौ. किर्ती फेथफुलवार, सौ. प्रियंका जिलगीलवार, अमोल ताटेवार, सौ. वैशाली गिदेवार, सौ. अंजली पारेलवार, बबलु ताटेवार, दिलीप पारेवार, अरविंद ताटेवार, सौ. प्रणाली गिदेवार, सौ. रश्मी गुतीवार, डॉ. धनश्री जिलगीलवार, डॉ. गौरव जिलगीलवार, सौ. सारिका जिलगीलवार, कु. मोनाली फेथफुलवार, पराग सुंकरवार, सचिन बोम्रतवार, सचिन कोंण तमवार, रामेश्वर,मंकिवार अजय वडनेलवार, समीर पुंजरवार, सरिता पार्लेवार, राधा पार्लेवार तसेच सर्व समाज बांधवानी मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे सांगता भोजन समारंभाने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here