15 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिन

0
26

15 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिन

 

चंद्रपूर,दि. 11 : जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे, जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात येत आहे.

 

या महिला लोकशाही दिनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापने विषयक बाबी आणि विहित अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी, ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज, दोन प्रतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात सादर करावेत. जेणेकरुन, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबधित विभागाला सदर तक्रार अर्ज पाठविण्यात येईल. विहित अर्जाचा नमुना मिळविण्यासाठी कार्यालयास भेट द्यावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

 

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here