सकारात्मक पत्रकारिता समाज परिवर्तनाची नांदी माजी मंत्री आ. संजय कुटे यांचे प्रतिपादन

0
49

सकारात्मक पत्रकारिता समाज परिवर्तनाची नांदी

माजी मंत्री आ. संजय कुटे यांचे प्रतिपादन

जळगाव (जामोद) येथे अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे एक दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन

गुरुकुंज स्वर संध्या

राष्ट्रसंतांच्या विचारांनी अधिवेशन परिसर गजबजून गेला होता

 

प्रिंट व इले. मीडियाकरीता पत्रकार कल्याण महामंडळ स्थापण करण्याची मागणी

—————————————-

 

 

पत्रकारिता हे पवित्र कार्य आहे. पत्रकारांनी कोणाविषयी लिहले तर त्यांनी ते सकारात्मक घ्यावे व त्यातून पुढची दिशा ठरवावी. मात्र पत्रकारांनी आपल्या लिखानामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पत्रकारांनी संसाराकडे लक्ष देऊनच पत्रकारिता करावी. मी विधानसभा सभागृहात पश्चिम विदर्भाविषयीच्या समस्या ३ वेळा मांडल्या आहेत. अमरावती विभागातील पत्रकारांनी सुध्दा पश्चिम विदर्भाला प्राधान्य देत या परिसरातील बाबींवर विशेष लिखान करावे. सकारात्मक पत्रकारिता ही समाज परिवर्तनाची नांदी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. तसेच पत्रकारांच्या पाठीशी नेहमी असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले. ते जळगाव (जामोद) येथील बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या देवाशिष लॉन्स येथे गुरूवारी आयोजित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या एक दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशनात उद्घाटनीय भाषणात बोलत होते. या अधिवेशनाचे आयोजक अखिल भारतीय पत्रकार संघ तर संयोजक आम्ही जळगांवकर पत्रकार होते.

या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात सकाळी उद्घाटन समारंभ झाला. याचे उद्घाटन माजी मंत्री,आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष तथा दै.लोकमत मुंबई चे सहयोगी संपादक यदु जोशी, आय.एन.एस. समिती, नवी दिल्ली चे कार्यकारी सदस्य तथा दै. हिन्दुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य तथा दै. वृत्तकेसरी अमरावतीचे संपादक जयराम आहुजा, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे, दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक, अमरावती विभागीय अधिस्विकृती समिती सदस्य सुरेंद्रकुमार आकोडे, गोपाल हरणे, अ. भा. ग्रामिण पत्रकार संघाचो केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, महिला मंच प्रदेश अध्यक्ष जयश्री पंडागळे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय सदस्य माणिक ठाकरे, प्रदीप जोशी, केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा.रवींद्र मेंढे, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, मनोहर चरपे, संजय कदम, अभिमन्यू भगत, अंबादास सिनकर, कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, राजेंद्र माळवे, मनोज कमटे, अनुप गवळी, प्रताप मोरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वागतगीत संजय तल्हार यांनी सादर केले तर प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी केले. यानंतर यदु जोशी, विलास मराठे, रवींद्र लाखोडे, मनोहर सुने यांनी मनोगत व्यक्त केले. तर व्दितीय सत्र दुपारी झाले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्वाती संदिप वाकेकर, राजर्षी शाहू परिवार तथा संकल्पक वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदिप शेळके, मिना राहीज, वर्षा घाडगे, भावना सरनाईक आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांसह माधुरी शर्मा, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणीक यांसह इतर पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल अभिमन्यु भगत व कांचन मुरके यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र मेंढे यांनी केले. या अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता अ.भा.ग्रा. पत्रकार संघ, जळगाव जामोद तालुका कार्यकारीणी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर, अमरावती व इतर कार्यकारीणीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या अधिवेशनात चांदा पासून तर बांदा पर्यंत सर्व राज्यभरातील पत्रकार बांधव सहभागी झाले होते.

 

(बॉक्स)

 

१)

 

पत्रकारांच्या समस्यांचा अहवाल शासनाला देणार

 

ग्रामिण भागातील पत्रकारांच्या समस्यांची मला कल्पना आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या घेऊन यासंबंधीचा अहवाल काही दिवसांतच शासन दरबारी देणार आहो. त्यामुळे यातील जास्तीत जास्त विषय मार्गी लागावे याकरिता आमदार डॉ. संजय कुटे यांनी सहकार्य करावे अशी विनंती यावेळी राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी केली.

 

२)

 

अधिवेशनात मांडले २३ ठराव

 

प्रिंट मिडीया व इले. मिडीयाकरीता पत्रकार कल्याण महामंडळ स्थापण करण्यात यावे, तालुका स्तरावर पत्रकार भवनाचे बांधकाम करण्यात यावे, पत्रकाराच्या शिबीर व कार्यशाळाकरीता अनुदान देण्यात यावे, ग्रामीण व शहरी पत्रकारांसाठी म्हाडा मार्फत स्वतंत्र घरकुल योजना राबविण्यात यावी, पत्रकारांच्या सुरक्षीततेच्या हमीसह विमा योजना शासनाने लागू करावी, पत्रकारांना (५ वर्ष सेवा पूर्ण झालेले) मानधन लागु करण्यात यावे व ६० वर्षानंतर पेंशन योजना लाभ मिळावा, विना परवानगी व्देष भावनेतून ग्रामीण व शहरी पत्रकारांवर न्यायालयीन खटले, अथवा पोलीस कार्यवाही जिल्हाधिऱ्यांच्या परवानगीशिवाय गुन्हा नोंद करण्यात येवू नये, पत्रकारांना वृत्तसंकलनाच्या कामाकरीता एस. टी. व रेल्वेमध्ये विनाअट सवलत मिळावी यांसह विविध २३ ठराव या अधिवेशनात मांडून त्याची प्रत शासनाकडे पाठविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here