29 डिसेंबर ऑनलाईन डाटा कामावर संपूर्ण बहिष्कार व 12 जानेवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा आशांचा इशारा…

0
122

29 डिसेंबर ऑनलाईन डाटा कामावर संपूर्ण बहिष्कार व 12 जानेवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा आशांचा इशारा…

 

चंद्रपूर : दि. 18 ऑक्टोम्बर ते 9 नोव्हेंबर 23 दिवस चाललेल्या आशांच्या संपाला मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व आरोग्यमंत्री सावंत यांनी आशा वरकरला 7,000₹ व गटप्रवर्तकांना 10,000₹ मानधन वाढ, 2000₹ दिवाळी बोनस, गटप्रवर्तकांना कायम करण्याची शिफारस केंद्राकडे पाठविणे, apl व bpl कामाचे मोबदला देणे, आरोग्य वर्धिनीचा मोबदला देणे व ऑनलाईन कामावरची सक्ती करणार नाही, संप काळातील मानधन कापणार नाही आदी आश्वासन दिली…आश्वासनावर विश्वास ठेवून आशावादी आशानी संघटनेच्या वातींन विजय मेळावे साजरे करण्यात आले…ऑनलाईन कामावरची सक्ती चालूच ठेवण्यात आली… संप कळातील मोबदलाही कापण्यात आला…आश्वासनाची पूर्तता करुन gr काढावे यासाठी आशा व गटप्रवर्तक फेडरेशन सिटू तर्फे सतत पाठपुरावा करण्यात आले, 27 डिसेंबर ला मंत्र्याशी चर्चा होऊ शकली नाही… म्हणून सिटू सलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशन तर्फे 29 डिसेंबर पासून ऑनलाईन कामावर संपूर्ण बहिष्कार व 12 जानेवारी पासून परत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे… आशा व गटप्रवर्तक संघटना (लाल बावटा) सलग्न सिटू, चंद्रपूर च्या वतीने जिल्ला आरोग्यधिकारी व मुख्य कार्यकारी अधीकारिंना पत्र देण्यात आले… आश्वासनाच्या पुरतातेसाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार असे एका प्रसिद्ध पत्रका द्वारे कॉ. अरुण भेलके, कॉ. प्रमोद गोडघाटे, सायली बावणे, ग. प्र. सुलभा पाटील, शोभा कुरेकर, गh. प्र. वंदना बडवाईक, उषा येनूरकर यांनी कळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here