संतांच्या विचारांना कृतीतून साकारा. स्वच्छता ही सेवा.              – रोशनी कांबळे

0
26

*आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत*

 

संतांच्या विचारांना कृतीतून साकारा. स्वच्छता ही सेवा.

             – रोशनी कांबळे

– राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट-गाईड च्या वतीने राबविले शालेय परिसर स्वच्छता अभियान.

 

राजुरा 20 डिसेंबर

 

बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्याने शालेय परिसर स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबांबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगेबाबांच्या जीवन चरित्रविषयी माहिती दिली.

यावेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका तथा जिजामाता गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर , राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट मास्तर बादल बेले, जयश्री धोटे, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, ,प्रशांत रागीट, विकास बावणे, मेघा वाढई,आशा बोबडे, भाग्यश्री क्षिरसागर, वैशाली चिमूरकर, स्वीटी सातपुते, माधुरी रणदिवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्काऊट मास्तर रुपेश चिडे यांनी केले.

यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका रोशनी कांबळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या संतांचे विचार हे आपण आपल्या कृतीतून साकारले पाहिजे. स्वच्छता हीच खरी सेवा असून त्यात सातत्य ठेवले पाहिजे. आपण या थोर समाजसुधारकांचा आदर्श ठेवून आपले जीवन जगले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here