*आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत*
गणित विषयाची भीती न बाळगता गणिताशी मैत्री करा.
- – नवनाथ बुटले
राजुरा 22 डिसेंबर
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने आदर्श शाळेत श्री निवास रामानुजम यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीनिवास रामानुजम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी ला गणित विषय शिकविणारे नवनाथ बुटले व इयत्ता पहिली ला गणित विषय शिकविणाऱ्या सुनीता कोरडे यांना शॉल व पेन भेट देऊन सत्कार करण्यात आला. बादल बेले यांनी श्रीनिवास रामानुजम यांच्या
जीवन चरित्रविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांकरीता गणितीय चिन्ह व त्यांची नावे अशी स्पर्धा घेण्यात आली.यात इयत्ता पहिली ते दहावी च्या सत्तर विद्यार्त्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक गुणवंत लीलाधर सोमनकर इयत्ता दहावी, द्वितीय क्रमांक मृणाली बंडू भोयर इयत्ता नववी, तृतीय क्रमांक निधी दिलीप चापले इयत्ता सातवी , प्रोत्साहनपर क्रमांक प्राची नेताजी पावडे इयत्ता सहावी, वेदांती किशोर भोंगळे इयत्ता पाचवी यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका तथा जिजामाता गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर , स्काऊट मास्तर रुपेश चिडे, जयश्री धोटे, सुनीता कोरडे ,प्रशांत रागीट, विकास बावणे, आशा बोबडे, भाग्यश्री क्षिरसागर, वैशाली चिमूरकर, स्वीटी सातपुते आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट मास्तर बादल बेले यांनी केले.
नवनाथ बुटले ,गणित विषय शिक्षक, यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले गणित विषयाची मनात भीती न बाळगता त्याची आवड निर्माण करावी. गणित विषय सर्वात सोपा असून अभ्यासाचे सातत्य, गणितीय चिन्ह, सूत्र, छोट्या छोट्या पद्धत्ती यांचा नियमितपणे सराव केला पाहिजे. मानवी जीवनात गणित विषयाचे अनन्य असे विशेष महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकांनी गणित विषयाची जवळीक निर्माण करावी.