*लक्षनीय बातमी*
पिक विम्याची रक्कम घरी नेण्यासाठी शसस्त्र
पोलीस सुरक्षा देण्याबाबत पोलीस अधीक्षकांना शेतकऱ्याची विनंती!
ज
सुनिल गेडाम सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यामधील शिवणी या गावातील शेतकरी दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याला सन 2023 च्या खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकासाठी मिळालेल्या पीकविम्याची रक्कम घरी नेतांना दरोडा पडण्याची भीती असल्याने पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कडे अर्ज करून सशस्त्र पोलीस बंदोबस्त मिळण्याची विनंती केली आहे, पिक विम्याची रक्कम ही खूप मोठी असल्याने पोलीस अधीक्षक यवतमाळ हे संबंधित शेतकऱ्याला पोलीस बंदोबस्त पुरवणार का हे आता बघायचं आहे, माहिती पुढील प्रमाणे यवतमाळ जिल्ह्या मधील मौजा शिवनी मधील शेतकरी दिलीप वामन राठोड यांना कापूस सोयाबीन या खरीप पीकाचे झालेल्या नुकसान झाल्याने केंद्र व राज्य सरकारच्या मेहरबानीने पिक विमा कंपनीने दिलेली नुकसान भरपाई 52 रु 99 पैसे इतकी मोठी व भरीव रक्कमेचा पिक विमा मंजूर केल्याने सदरची ही रक्कम मिळत असून ही रक्कम या गरीब शेतकऱ्यांसाठी खूप आहे , तसे बघितले तर ही रक्कम 50 खोक्यापेक्षाही खूप मोठी असल्याने मिळत असलेल्या रक्कमेच्या सुरक्षितची काळजी या शेतकऱ्याला लागली असून ही रक्कम बँकेतून नेताना पिशवी व सुटकेस मध्ये नेने श्यक्य नसल्याने विमा कंपनी कडून पिक विम्याची रक्कम नेण्यासाठी पिशवी किंवा सुटकेस मधून नेन अश्यक्य असल्याने त्यांच्या घरी वडिलोपार्जित असलेली तिजोरी ही बैलबंडी वर बँकेत आणत असून सदर रक्कम तिजोरीत भरून बैलबंडी ने नेताना रस्त्यात
सशस्त्र दरोडा पडून लुटमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जिल्यातील संपूर्ण जिल्ह्याची व चोरट्यांची नजर या रक्कमेवर लागून असल्याने व ही रक्कम या शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाची असल्याने सिवीला च्या अटीमुळे पिक कर्ज न मिळाल्याने शेती पीकविण्यासाठी तातडीने सावकराकडून कर्ज घेतले आहे,त्या मुळे सर्व प्रथम या पिक विम्याच्या रक्कमेमधून सावकारचे कर्ज व्याजासह फेडने आवश्यक आहे,सावकारचे कर्ज फेडल्यानंतर सुद्धा या रक्कमेमधून शेतातील उभ्या पिकाची नासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यापासून पिकाला संरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण शेताला तारे चे कुंपन करायचे आहे,त्या नंतर शेतात अहोरात्र कष्ट करणाऱ्या बायकोला दवाखान्यात सुद्धा दाखवयाचे आहे,गेल्या अनेक दिवसापासून या शेतकऱ्याचा मुलगा फाटकी पॅन्ट घालून शाळेत जात होता त्याच्या साठी ब्रँडेड कपडे घेण्याची सुद्धा तयारी आहे, आणी इतक सगळं करून सुद्धा पिक विमा च्या रक्कम उरत असल्याने संपूर्ण कुटुंबाला सहल म्हणून गुवहाटी ला न्यायचं असल्याने पिक विम्या मधून मिळणारी 52 रु 99 पैसे ही रक्कम खूप मोठी असून संबंधित रक्कम ही चोरी होऊ नये या करीता पोलीस अधीक्षक हे या शेतकऱ्याला ही रक्कम घरी नेण्यासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त पुरवातील अशी आशा आहे.