*सिमेंट कंपनी विरोधात सरपंच संघटना उद्यापासून करणार आमरण उपोषण तीन दिवसांचा दिला होता इशारा*

0
172

✒️ *आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृतांत*

 

 

*सिमेंट कंपनी विरोधात सरपंच संघटना उद्यापासून करणार आमरण उपोषण तीन दिवसांचा दिला होता इशारा*

*’मी माझ्या गावासाठी’ गावकऱ्यांच्या हातात फलक*

 

कोरपना – अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर यांच्या विरोधात दत्तक ग्राम सरपंच संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे साखळी उपोषण सुरू असून आंदोलनाची योग्य दखल घेतली न गेल्याने उद्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे सरपंच संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे कंपनीसमोर आणखी मोठे आव्हान उभे होणार आहे.

दत्तक गावांतील सीएसआर निधी वाटपांतर्गत तिढा सोडवण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी ४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंच संघटना कंपनीविरोधात साखळी उपोषणासाठी बसली आहे. मागण्यांना विविध राजकीय पक्षासह व्यापारी असोसिएशन, विविध सामाजिक संघटना व पत्रकार संघांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

दत्तक गावातील नागरिकांनी ‘मी माझ्या गावासोबत’ अशा प्रकारची फलके दाखवून सरपंच आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तीन दिवस उलटून गेले तरी कंपनीच्या कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याने आतापर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट देऊन चर्चा न केल्याने सरपंच संघटनेने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सरपंच संघटनेच्या आंदोलनाला दत्तक गावातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून आंदोलनाने विशाल स्वरूप घेतले आहे.

उद्या (दि. १६) पासून होणाऱ्या आमरण उपोषणास गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सहभाग घ्यावा असे आवाहन दत्तक ग्राम सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here