*सास्ती ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी,शेतकरी संघटना समर्पित ग्रामविकास परिवर्तन पॅनलची एकहाती सत्ता*

0
213

✒️जिल्हा प्रतिनिधी आशिष रा. यमनुरवार
*सास्ती ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी,शेतकरी संघटना समर्पित ग्रामविकास परिवर्तन पॅनलची एकहाती सत्ता*

*नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले अभिनंदन*

*सरपंच पदी भाजपाच्या सौ सुचिता अश्विन मावलीकर भरघोस मतांनी विजयी*

राजुरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणारी सास्ती ग्रामपंचायतचा निवडणूक निकाल पार पडला नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत,राजुरा तालुक्यातील सास्ती ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पक्ष शेतकरी संघटना समर्पित ग्रामविकास पॅनेलची एकहाती सत्ता काबीज करण्यात यश आले,यात सरपंच पदी भाजपाच्या सौ सुचिता अश्विन मावलीकर भरघोस मतांनी विजयी झाल्या,तर सदस्य पदी 11पैकी 10 उमेदवार विजयी झाले,तसेच रामपूर ग्रामपंचायत मध्ये १ सदस्य तर आर्वी ग्रामपंचायत मध्ये १सदस्य असे उमेदवार विजयी झाले या सर्व उमेदवारांवर जनतेने दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.असे मत नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांनी विश्वास व्यक्त केला!!

निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी आमदार अँड संजयजी धोटे व माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांनी अभिनंदन करूनपुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,तसेच भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व मतदार राजाचे मनापासून आभार मानले,व विजयी उमेदवारांसाठी विजयासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here