कल्याण संघटक पदासाठी 24 डिसेंबर रोजी मुलाखत

0
15

कल्याण संघटक पदासाठी 24 डिसेंबर रोजी मुलाखत

 

v इच्छूक माजी सैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 17: जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, गडचिरोली करीता माजी सैनिक प्रवर्गामधून अशासकीय, निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मेस्कोमार्फत कल्याण संघटक पद भरावयाचे आहे. या पदासाठी इच्छूक माजी सैनिकांनी दि.24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 12.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, गडचिरोली येथील कार्यालयात सैन्य सेवेतील संपुर्ण मुळ आणि छायाकिंत कागदपत्रांसह मुलाखतीकरीता हजर राहावे.

 

तसेच अशासकीय कल्याण संघटक पदाकरीता सैन्यातील नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा वरील हुद्यावर काम केलेल्या संवर्गातून उमेदवार निवडीला प्राधान्य देण्यात येईल. त्यासोबतच, संगणक अहर्ता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इंग्रजी व मराठी टंकलेखन असणाऱ्यांना प्रथम प्राध्यान्य राहिल, असे चंद्रपूर व गडचिरोलीचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

 

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here