हरविलेल्या व्यक्तिबद्दल संपर्क करण्याचे आवाहन

0
55

हरविलेल्या व्यक्तिबद्दल संपर्क करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 4 : शहरातील विठ्ठल मंदीर वार्ड येथील रहिवासी चंद्रकांत उर्फे पप्पु वामनराव मानमोडे (वय 35 वर्षे) हा 23 सप्टेंबर 2024 रोजी काही न सांगता आपले घरून सकाळी 5 वाजता निघून गेला. सदर इसम आजपावेतो घरी परत न आल्याने त्याचा मारडी, जळगाव, आर्वी येथे नातेवाईकाकडे फोनद्वारे विचारणा केली असता तो गावाकडे आला नाही, अशी माहिती मिळाली. तसेच चंद्रपूर शहरात रेल्वे स्टेशन, बसस्थानक, गांधी चौक, जटपुरा गेट, महाकाली मंदीर परीसरात, इतर वार्डात व मित्रांकडेसुध्दा शोध घेतला असता मिळून न आल्याने चंद्रकांतच्या आईच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशनला नोंद घेऊन त्याचा शोध घेणे सुरू आहे. सदर व्यक्ति कोणालाही आढळल्यास शहर पोलिस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

हरविलेल्या व्यक्तिचे वर्णन : बांधा – मजबूत, उंची – 5 फुट 6 इंच, रंग -गोरा, केस -काळे, डोळे -टपोरे, चेहरा -गोल, नाक -सरळ, अंगात टी शर्ट, क्रिम रंगाचा काळया रंगाचा जिन्स पॅन्ट घातलेला असून उजव्या खांदयावर गोंदन आहे.

 

दुस-या प्रकरणात शहरातील समाधी वॉर्ड येथील रहिवासी लक्ष्मी सागर पवार (वय 19) ही 27 नोव्हेंबर 2024 रोजी कोणाला काही न सांगता परस्पर घरून निघुन गेली आहे. वार्डात व नातेवाईक यांच्याकडे विचारपुस केली असता तिचा शोध लागला नाही. तसेच चंद्रपूर शहर, जटपुरा गेट, गांधी चौक, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मुख्य रेल्वे स्टेशन, रामाळा तलाव येथे शोध घेतला असता पत्नी मिळून न आल्याने तिचे पती सागर शिवाजी पवार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनला मिसींग रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन : बांधा- सळपातळ, उंची – 4 फुट 5इंच, रंग -सावळा, केस -काळे बॉबकट, डोळे -टपोरे काळे, चेहरा -गोल, अंगात पिंक रंगाचा नाईट ड्रेस, अंगात सोन्याचे मंगळसुत्र, उजव्या हाताच्या मध्यमा बोटामध्ये सोन्याची अंगठी व कंरगळी मध्ये चांदीची अंगठी आहे. पायात पैजन तिला मराठी कन्नड, हिन्दी, इंग्रजी अशा भाषा बोलता येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here