जिल्ह्यासाठी सहा निवडणूक निरीक्षक निश्चित
Ø तीन सामान्य निरीक्षक, दोन खर्च पथक तर एक कायदा व सुव्यवस्था निरीक्षक
चंद्रपूर, दि. 30 : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक निश्चित झाले असून यात तीन सामान्य निरीक्षक, दोन खर्च पथक निरीक्षक तर एक कायदा व सुव्यवस्था निरीक्षक आहेत.
सामान्य निवडणूक निरीक्षक : 70 – राजूरा व 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी आर. मुत्यालाराजु रेवु (आय.ए.एस. आंध्र प्रदेश) निवडणूक निरीक्षक असून संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक 9405671147 आहे. निवडणूक कालावधीत त्यांच्या निवासाचा पत्ता ‘पांगारा’ कक्ष, वन अकादमी, मुल रोड चंद्रपूर येथे असून चंद्रपूर व राजुरा मतदारसंघातील नागरीक व राजकीय पदाधिका-यांसाठी ते दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत वन अकादमी येथील ‘पांगारा’ कक्षात उपलब्ध असतील.
72 – बल्लारपूर व 73 -ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून संगिता सिंग (आय.ए.एस. बिहार) असून संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक 9145768992 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता ‘शामली’ कक्ष, वन अकादमी, चंद्रपूर येथे असून नागरीक व राजकीय पदाधिका-यांसाठी त्या दररोज सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत वन अकादमी येथील ‘शामली’ येथे उपलब्ध असतील.
74 – चिमूर व 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघाकरीता संजय कुमार (आय.ए.एस. उत्तर प्रदेश) असून संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक 9403473147 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता ‘पलाश’ कक्ष, वन अकादमी, चंद्रपूर येथे आहे. नागरिकांसाठी दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत ते वन अकादमी येथील ‘पलाश’ येथे उपलब्ध असतील.
खर्च पथक निरीक्षक : 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर आणि 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासाठी खर्च पथक निरीक्षक म्हणून आदित्य बी. (आय.आर.एस.) असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9422580147 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता खोली क्रमांक 203, पहिला माळा, रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर आहे. नागरिकांसाठी तसेच राजकीय पदाधिका-यांसाठी ते सकाळी 10 ते 12 या वेळेत रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे उपलब्ध असतील.
73 – ब्रम्हपुरी, 74 – चिमूर आणि 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघासाठी खर्च पथक निरीक्षक म्हणून धर्मेंद्र सिंह (आय.आर.एस.) असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9145767949 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता खोली क्रमांक 201, पहिला माळा, रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर आहे. नागरिकांसाठी तसेच राजकीय पदाधिका-यांसाठी ते सकाळी 11 ते 12 या वेळेत रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे उपलब्ध असतील.
कायदा व सुव्यवस्था निरीक्षक : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक म्हणून अवधेश पाठक (आय.पी.एस.) असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9404063147 आहे. त्यांचा निवासाचा पत्ता ‘बकूल’ वन अकादमी, चंद्रपूर असून नागरिकांसाठी ते सकाळी 10 ते 11 या वेळेत उपलब्ध राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.