*संतांनी समाजावर मानवतेचे संस्कार केले*

0
16

*संतांनी समाजावर मानवतेचे संस्कार केले*

 

*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*

 

*संतांनी जात विरहित समाजाची संकल्पना मांडली*

 

*सकल कुणबी समाजाकडून ना. मुनगंटीवार यांचा हृद्य सत्कार*

 

*मूल, दि. १० : मानवतेची शिकवण देताना आपल्या संतांनी जात पाहिली नाही. संत तुकाराम यांचे अभंग काहींनी बुडविले. ते अभंग संत जगनाडेजी महाराज यांनी बाहेर काढले. हे करताना जगनाडे महाराजांनी जातीपातीच्या विचार केला नाही. संतांनीही कधी जातीला थारा दिला नाही. अगदी त्याचप्रमाणे आपणही फक्त भारतीय आहोत एवढी एकच बाब लक्षात ठेवली पाहिजे. संतांचा हाच वारसा सकल कुणबी समाज जोपासत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

 

कुणबी समाजाचा मेळावा मुल येथे पार पडला. यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने डी.लिट. (मानद डॉक्टरेट) मिळाल्याबद्दल कुणबी समाजाच्या वतीने ना. श्री. मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत बोबाटे , प्रशांत वाघरे गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष, रामपाल सिंग भाजपा महामंत्री,अमोल चुदरी माजी उपसभापती पंचायत समिती मुल,मांडवकर सर, विद्याताई बोबाटे, भावनाताई चौखुंडे,संजय घोगरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

 

या सत्कारामुळे आपण भारावून गेल्याची भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मूल येथील कन्नमवार सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकल कुणबी समाजाने माझ्यावर प्रचंड पुष्पवृष्टी केली. भव्यदिव्य अशी रॅली काढली. त्यामुळे चांगले काम करण्यासाठी मला आता दहा हत्तींचे बळ मिळाले आहे, असेही ते म्हणाले. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘माझ्या कार्यालयात अनेक नागरिक येतात. त्यांच्या पैकी कुणालाही आजपर्यंत मी कधी जात, धर्म, पंथ विचारला नाही. प्रसंगी विरोधी पक्षातील कार्यकर्तेही माझ्याकडे आले. त्यांचीही कामे तितक्याच तळमळीने केली. कारण मला मानवता हा एकच धर्म ठाऊक आहे. त्यामुळे आजपर्यंत फक्त विकासाचेच राजकारण केले.’

 

‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नामविस्तार करून घेण्याचे सौभाग्य मला लाभले. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाची पहिली वीट रचण्यात माझा हातभार होता. अमरावतीच्या विद्यापीठाला वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांचे नाव मिळवून देण्यात योगदान देऊ शकलो. हे सगळं करताना मी कधीही जात आडवी येऊ दिली नाही,’ असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

 

*असाही योगायोग*

एका विद्यार्थ्याने माझ्या कार्यावर पी. एचडी. केली. महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते त्या विद्यार्थ्याला पदवी बहाल करण्यात आली. नुकतेच गोंडवाना विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळावी, हा सुखद योगायोग असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.

 

*मुल येथे सभागृह उभारणार*

मुलमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या नावाने सभागृह उभारण्याचा शब्दही यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी सकल कुणबी समाजाला दिला. मुलमध्ये विश्रामगृह, तहसील कार्यालय, सीमेंट रस्ते, सौंदर्यीकरण अशी व्यापक कामे आपण केली. विरोधक चुकीची माहिती पसरवतात त्यामुळे धृतराष्ट्र बनलेल्या विरोधकांना जनताच उत्तर देईल, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here