आता व्हाट्सअप वर शासनाच्या विविध योजनांची

0
74

आता व्हाट्सअप वर शासनाच्या विविध योजनांची

 

माहिती 24 तास उपलब्ध

 

Ø जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

 

चंद्रपूर, दि. 8 : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर 24 तास उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्हाट्सअप चाटबोर्ड क्रमांक 94 22 47 57 43 हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, त्याचे फायदे, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल.

 

अशी आहे राबविण्यात येणारी प्रक्रिया : संभाषण सुरू करण्यासाठी Hi टाईप करा. कृपया भाषा निवडा. योजनांची माहिती मिळण्यासाठी या योजनेचा क्रमांक टाईप करा. जसे, 1. मुख्यमंत्री वयोश्री योजना, 2. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 3. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, 4. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, 5. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, 6. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना, 7. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 8. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 9. आयुष्यमान भारत योजना, 10 स्वच्छ भारत अभियान, 11. दीनदयाल अंत्योदय योजना, 12. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, 13. किसान क्रेडिट कार्ड योजना, 14 खेलो इंडिया, 15. जनधन योजना, 16. जीवन ज्योती विमा योजना, 17. सुरक्षा बीमा योजना, 18. अटल पेन्शन योजना, 19 पीएम मुद्रा प्रधानमंत्री, 20. प्रधानमंत्री आवास योजना, 21. प्रधानमंत्री पोषण अभियान.

 

असा होणार नागरिकांना लाभ : 24 बाय 7 सेवा उपलब्ध, तत्पर प्रतिसाद, उत्तरांमध्ये सातत्य, मानवी मदतीशिवाय ऑर्डर दिली जाऊ शकतात, वैयक्तिकरण, एकाच वेळी अनेकांशी संवाद साधने शक्य, वेळेची बचत, आधुनिक एपीआय मुळे समाकलित करणे सोपे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here