*पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील रमाई आवासच्या एकूण 864 घरकुलांना मंजुरी*

0
14

*पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील रमाई आवासच्या एकूण 864 घरकुलांना मंजुरी*

 

चंद्रपूर, दि. 27: सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतंर्गत जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्राप्त यादीनूसार 503 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आता हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने रमाई आवास योजनेंतर्गत तालुकानिहाय एकुण 503 घरकुलांना मंजुरी मिळाली असून नवीन 361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थीना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. असे एकूण 864 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.

 

रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या जागेवरती पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याने ही योजना वरदान ठरत आहे.

रमाई आवास (ग्रामीण) योजनेसाठी सन 2019-20 ते 2023-24 या आार्थिक वर्षाकरीता जिल्ह्यासाठी 21 हजार 902 चे उद्दिष्ट होते. त्यापैकी एकूण 20 हजार 378 घरकुलास मार्च 2024 पर्यंत मंजूरी देण्यात आलेली होती. त्यामधून एकूण 1524 शिल्लक उद्दीष्टापैकी प्राप्त यादीनूसार 503 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.

त्याचप्रमाणे, सन 2018-19 ते 2023-24 मधील मंजूर लाभार्थीमधून सर्वेक्षणादरम्यान आजपर्यंत एकूण 521 लाभार्थी अपात्र आढळून आले असून सदर लाभार्थी रद्द करण्यात आले. त्याऐवजी नवीन 361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थीना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

 

*बैठकीत निर्णय:-*

सदर बैठकीत सन 2018-19 ते 2023-24 मधील एकूण 503 लाभार्थ्यांना मंजूरी प्रदान करण्यात आली असून सन 2018-19 ते 2023-24 मधील एकूण 361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थ्यांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच संबंधित गटविकास अधिकारी यांना स्थळ पंचनामे होताच याद्या मंजुरीसाठी सादर करुन उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तसेच सन 2018-19 ते 2023-24 या आर्थिक वर्षातील रद्द झालेल्या लाभार्थ्यांऐवजी पात्र लाभार्थी यादी मंजुरीसाठी सादर करणेस्तव राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना दिलेल्या आहेत.

 

*361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थी (तालुकानिहाय घरकुल):*

चंद्रपूर – 4, गोंडपिपरी -147, पोंभुर्णा -37, वरोरा – 51, नागभीड – 16, चिमूर – 88, जिवती – 4, ब्रह्मपुरी – 14

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here