#चंद्रपूर येथील ओबीसी, एन. टी. (भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांसाठींचे #वसतिगृह १७ ऑगस्टपासून सुरू

0
105

#चंद्रपूर येथील ओबीसी, एन. टी. (भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांसाठींचे #वसतिगृह १७ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील परिषद सभागृहात विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत दिली. यावेळी मंत्री अतुल सावे उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे याकडे लक्ष देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था चांगली करुन वसतिगृहातील सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. वसतिगृह प्रवेशासाठी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन नाही. याबाबत विभागाने जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत स्पष्ट माहिती पोहोचवावी. विद्यार्थ्यांना याबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here