युवा नेते करण देवतळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात
महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंञी तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंञी स्वर्गीय संजय बाबु देवतळे यांचे चिरंजीव समाजसेवक युवा नेते करण देवतळे यांचा चंद्रपूर कटारीया मंगल कार्यालय वरोरा येथे वाढदिवस गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सायकल वाटप व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्य़ातील अनेक गाव खेड्यातील हजारो चा संख्येने जनसमुदाय उसळला.
देवतळे कुटूंबाचा संस्कृतीचा जो वारसा आहे. आपण करण देवतळे यांचा माध्यमातून समाजकारणातुण, राजकारणातुन जपला पाहिजे.
मी तीन वेळा खासदार राहिलो पण जातीचे राजकारण अथवा पैसै वाटून निवडणुक जिंकली नाही. ओबीसी आयोगा भारत सरकार चे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर त्यांनी आपल्या मत अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
समाजसेवक युवा नेते करण देवतळे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला सकाळी सात वाजेपासून जनसमुदाय जमण्याला सुरुवात झाली. यावेळी. विविध पक्षांतील दिग्गज नेते विजय देवतळे, प्रकाशबाबु मुथा, नागो थुटे सर, एतेशाम अली, विलास नेरकर, शंभुनाथ वरघने, आशिष ठाकरे, सुधाकर रोहनकर, निशांत देवगडे, दत्ता बारेकर, अफजलभाई, विविध भागातील जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक, युवावर्ग, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंञी स्वर्गीय संजय देवतळे यांना आपला माणूस म्हणून आलेला जनसमुदाय, हजारो चा संख्येत उपस्थित होते. यावेळी समाजसेवक युवानेते करण देवतळे यांचेवर शुभेच्छाचा वर्षाव झाला. तर अनेक मान्यवरांनी समाजसेवक युवा नेते करण देवतळे यांचा राजकीय कारकीर्दीला उजाळा दिला. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. करण देवतळे यांचा मित्रपरिवरांनी वाजत गाजत त्यांना आगळा वेगळा वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा नेते समाजसेवक करण देवतळे यांनी आपल्या सर्व जिवाभावाचा मंडळीचे आभार मानले.