प्रतिबंधीत संघटना ‘सिमी’ बाबत केंद्र शासनाचे अधिकार राज्यांनाही वापरण्याचे निर्देश

0
38

प्रतिबंधीत संघटना ‘सिमी’ बाबत केंद्र शासनाचे अधिकार राज्यांनाही वापरण्याचे निर्देश

 

चंद्रपूर, दि. 22 : केंद्र शासनाने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 कायद्याच्या कलम 3 च्या उप कलम (1) द्वारे स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडीया (सिमी) ला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे. तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 कायद्याच्या कलम 42 द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करतांना केंद्र सरकारने 5 फेब्रुवारी 2024 च्या अधिसुचनेनुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन देखील या कायद्याच्या कलम 7 आणि कलम 8 अंतर्गत केंद्र सरकारद्वारे वापरता येणारे अधिकारी वापरतील असे निर्देश दिले आहे.

 

सदर आदेश महाराष्ट्र शासन, गृह विभागाकडून जिल्हा प्रशासनाला 21 मार्च 2024 रोजी प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here