लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाची बैठक
चंद्रपूर, दि. 13 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत राजकीय पक्षाची बैठक सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार (निवडणुक) किशोर साळवे, सुजित पेंदोर, प्रतिनिधी शिवसेना (उ.बा.ठा), प्रमोद पाटील, प्रतिनिधी शिवसेना(उ.बा.ठा) व धीरज शेडमाके, जिल्हाध्यक्ष, गोंडवाना जनतंत्र, राहुल नैताम,जनसेवा गोंडवाना पार्टी व गणेश कुळसंगे उपस्थित होते.
यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी राजकीय पक्षाच्या उपस्थित पदाधिकारी यांना खालील सुचना दिल्या.
1)दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी मतदार अंतीम यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीमध्ये काही मतदारांचे नाव कमी झाले असेल किंवा सुटलेले असतील, त्यांची नावे समाविष्ठ करता येईल. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाने मतदार यादी पुन्हा तपासावी व ज्या मतदाराचे नाव यादीत नाही किंवा कमी करण्यात आले आहे, अशांची नावे समाविष्ठ करण्याकरिता नमुना 6 फार्म मध्ये भरुन द्यावा. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये नामनिर्देशाद्वारे अर्ज सादर करण्याचे शेवटच्या तारखेपर्यत नमुना 6 तहसिल कार्यालयाच्य निवडणूक विभागात भरुन देता येईल, त्यानंतर मतदार यादीत नाव समाविष्ठ करता येणार नाही.
2)ईलेक्ट्रानिक मतदान यंत्र सुरक्षा कक्ष (Strong Room) तहसिल कार्यालयाचे इमारतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ची आचारसंहिता घोषित झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र प्राप्त होणार आहेत. प्रि- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षा कक्ष (Strong Room) प्रशासकीय इमारती मध्ये ठेवण्यात येणार आहे.
3)71-चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत निवडणुक प्रक्रिया मध्ये साधारण 2500 ते 2800 अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत कामे करण्यात येणार आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत एकूण 383 मतदान केंद्र आहे. यापूर्वी 379 मतदान केंद्र हेाते. यापैकी 4 मतदान केंद्रावर 1500 पेक्षा जास्त मतदार असल्यामुळे या ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आल्याचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.
००००००