पोंभुर्णा येथील वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिरात 751 रुग्णांची तपासणी     

0
44

पोंभुर्णा येथील वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिरात 751 रुग्णांची तपासणी

चंद्रपूर दि. 13 मार्च : ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर आदिवासी जनतेला तालुका स्तरावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने सार्वजनिक आरोग्य विभाग चंद्रपूर आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दूरचित्रवाणी द्वारे करण्यात आले. यावेळी तालुक्यातील 751 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोंभुर्णाच्या नगराध्यक्षा सुलभा पिपरे तर प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, डॉ. मंगेश गुलवाडे, विनोद देशमुख, अलका आत्राम अजय मस्के आदी उपस्थित होते. आरोग्य शिबिरामध्ये एकूण 751 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 2 मुख कर्करोग, 10 हायड्रोसील, 1 हर्निया, 29 मोतीबिंदूचे रुग्ण मिळाले. सदर रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव यांनी केले. संचालन भाग्यश्री भालेराव यांनी तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांनी मानले. शिबिराकरीता शरद पवार दंत महाविद्यालय सावंगी मेघे, वर्धा, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालय, पोंभुर्णा येथील अधिकारी कर्मचा-यांनी सहकार्य केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, तहसीलदार शिवाजी कदम, पोलिस निरीक्षक संजय सिंह, नगर पंचायत मुख्याधिकारी विकास चिडगलवार, संवर्ग विकास अधिकारी अरुण चनफने, बालविकास अधिकारी अमित लाडे, सागर खडसे, सचिन धोंडरे आदी उपस्थित होते.

०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here