रेती चोरीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून रेतीमाफियाचा प्राणघातक हल्ला
बाजार समितीचे माजी सभापती व इतर तिघे अटकेत
वरोरा तालुका प्रतिनिधी
जवळच असलेल्या माढेळी येथील अशोक चौधरी नामक व्यक्तीवर काल सायंकाळी ७ वाजता एका हॉटेल मध्ये प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले असल्याची घटना घडली.
त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माढेळी येथील काँग्रेसचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बदखल व सोबतच्या तीन सहकाऱ्यांनी अशोक चौधरी ह्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला असून सदर व्यक्तीला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर अवस्थेत असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
चार दिवसापूर्वी वेणा नदी च्या घाटातून अवैध रेती चे उत्खनन करीत असल्याने उपविभगिय पोलिस अधिकारी साटम
यांनी विशाल बदखल व इतर तिघांवर कारवाई केली असून सर्व हायवा, जेसीबी जप्त केले होते संबंधीत पोलिसांना माहिती देणारा अशोक चौधरी हाच असल्याचा संशय बदखल यांना आल्याने चौधरी रामने ह्यांच्या हॉटेल मध्ये बसला असता बदखल यांनी रॉड ने जबर मारहाण केली. एस.डी.पि.ओ साटम यांच्या नेतृत्वात आरोपीचा शोध घेतला असता पीएसआय अमोल काचोरे यांनी विशाल बदखल, वय ४५, राहणार माढेळी, लंकेश बदखल, राहणार येवती, संजय चिंचोलकर, यवती,मंगेश सोनटक्के यांना रात्रीच अटक करण्यात आली असून त्यांचेवर भादवी ३०७ कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील चौकशी करीत आहे .