*चंद्रपूरकरांना लाभलेला कोहीनूर हिरा सुधीर मुनगंटीवार- मंत्री मंगलप्रभात लोढा*

0
69

*चंद्रपूरकरांना लाभलेला कोहीनूर हिरा सुधीर मुनगंटीवार- मंत्री मंगलप्रभात लोढा*

 

*चंद्रपूर दि.०५-* राज्याचे कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी चंद्रपूर येथील ॲडव्हान्टेज चंद्रपूर या औद्योगिक विकास उपक्रमात सहभागी होताना राज्याचे वनमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर स्तुतीसुमनांची अक्षरशः उधळण केली. राज्याच्या राजकारणात अशी माणसं अभावानेच आढळतात. सुधीर मुनगंटीवार त्यापैकी एक आहेत.

 

आपल्या छोटेखानी भाषणात मंगलप्रभात लोढा म्हणाले, तुम्ही खनिज संपत्ती, वीज हे चंद्रपूरकरांसाठी ॲडव्हान्टेज असल्याचे सांगता, पण चंद्रपूरकरांसाठी खरा ॲडव्हान्टेज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आहेत. खरा कोहीनूर हिरा श्री.सुधीरभाऊ आहेत….

 

ना.सुधीर मुनगंटीवार हे अतिशय कार्यक्षम असे मंत्री आहेत. गावातील एखाद्या मजुराशी तितक्याच आपुलकीने वागणारे अन् इंग्लंडच्या पंतप्रधानांशीही त्याच प्रेमाने बोलणारी व्यक्ती सुधीरभाऊंच्या रुपात मी बघितली आहे. ते ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तिथेच समस्या निकाली निघते.‌ मी त्यांच्या सोबत १९९५ पासून विधानसभा सदस्य म्हणून कार्यरत आहे. माझ्यासाठी राजकारणातील हेडमास्तर, टीचर सुधीर मुनगंटीवार आहेत. मनातील सुख-दु:ख मी त्यांना सांगत असतो. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एकच हेल्पलाईन आहे… सुधीर मुनगंटीवार!

 

जे कोणाच्याच मनात येत नाही ते सुधीर मुनगंटीवार यांच्या नियोजनात असते. महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र राज्यगीत तयार करण्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे इंग्लंडमधून परत आणण्यासाठी सामंजस्य करारापर्यंत अनेक बाबी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारल्या आहेत.

 

यावेळी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील यशाचे गमक विशद केले. आपल्या संघर्षशील प्रवासाची कहाणी सांगत असतानाच, आयुष्यात चांगली माणसं गमावू नका. जीवनात जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा. आणि याला शाॅर्टकट नाही हे लक्षात ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here