*…….त्या रुग्णांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून तात्काळ आर्थिक मदत*

0
236

*…….त्या रुग्णांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून तात्काळ आर्थिक मदत*

 

*रानटी डुकराच्या हल्यात तीन विविध अपघातात नागरिक जखमी*

 

आजच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जीवन जगत असताना शेतकरी वर्गांना आसमानी सुलेमानी संकटाचा वन्यजीवांच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे अशातच

 

सावली तालुकयात जंगली जनावरांच्या हल्यात नागरिकांना गंभीर दुखापत,अनेक वेळा मृत्युमुखी पडल्याचा घटनात वाढ होण्याचे प्रमाण दिवसांदिवस वाढत चालले आहे,त्यातच तालुक्यातील एका चालू हफ्त्यात ३ विविध घटनात ३ शेतकऱ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे ते ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती आहेत.*

 

*नामे ढेकलू मारोती झरकर वय ५० वर्षे रा.रुद्रापूर घराकडे जात असताना वाटेत जंगली डुकराने जोरदार धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले,बंडू गणपती बोदलकर वय ५३ वर्षे रा.लोंढोली व चरनदास नामदेव कोरडे वय ५६ वर्षे रा.राजोली फाल हे शेताकडून काम करून घरी परत येताना जंगली डुकराच्या हल्यात जखमी झाले.हे तिन्ही रुग्ण ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती आहेत त्यांची परिस्थीती अत्यंत गरीब असल्याने त्यांना आर्थिक मदत पुढील उपचारासाठी पाहिजे असल्याची बातमी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी गोर गरीब जनतेच्या सैदव पाठीशी असणारे,जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना दिली, विजयभाऊ वडेट्टीवार तात्काळ सदर रुग्णांना आर्थिक मदत पोचता केली.*

 

*आर्थिक मदतीचे वितरण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार,युवा शहर अध्यक्ष मा.अमरदीप कोणपत्तीवार,आरोग्य व पाणीपुरवठा सभापती मा.प्रीतम गेडाम,ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.दिलीप लटारे यांच्या हस्ते देण्यात आले,रानटी जनावरांच्या हल्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचे बंदोबस्त करण्याची मागणी मा.निखिल सुरमवार यांनी केली आहे*

 

*या प्रसंगी नगरसेवक मा.नितेश रस्से,युवक काँग्रेस कार्यकर्ता मा.पिंटू गड्डमवार,मा.निखिल दुधें,मा.आकाश खोब्रागडे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.गजेंद्र मानापुरे मा.राजू बुरीवार,मा.रोहित गेडाम,मा.मयूर दुधे तसेच अनेक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here