*व्याहाड बुज येथे मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर संपन्न.*

0
43

*व्याहाड बुज येथे मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर संपन्न.*

 

*सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम तालुका काँग्रेस कमिटी सावली,ग्राम काँग्रेस कमिटी व्याहाड (बुज) यांच्या संयुक्त उपक्रम*

 

*दिनांक :- २१ फेब्रुवारी २०२४*

 

सावली:- राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सेवाभावी जनसेवा हिच ईश्वर सेवा या संकल्पनेतून आज व्याहाड बुज येथे सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम तालुका काँग्रेस कमिटी सावली,ग्राम काँग्रेस कमिटी व्याहाड (बुज) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर लक्ष्मी मेडिकल जवळ, व्याहाड (बुज)येथे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाचे उदघाटन मा.संदीप पा.गड्डमवार,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रपूर,सह उदघाटन मा.दिनेश पा.चिटनुरवार माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर,अध्यक्ष म्हणून सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,विशेष अतिथी म्हणून सावली तालूका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,मा.निखिल सुरमवार, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे उदघाटन महापुरुष्यांच्या प्रतिमाना माल्यार्पण करून सुरु झाले, या सेवाभावी शिबिराचा हजारो लोकांनी लाभ घेतला,पात्र झालेल्या नागरिकांना पूढील शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे तात्काळ पाठविण्यात आले.

 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.किशोर कारडे अध्यक्ष,तालुका युवक काँग्रेस,मा.सुनिल बोमनवार अध्यक्ष किसान राईस मिल व्याहाड बुज,मा.अनिल गुरनुले अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ सावली,मा.दिपक गद्देवार सामाजिक कार्यकर्ता, मा.सचिन इंगुलवार अध्यक्ष सेवा सहकारी संस्था व्याहाड बुज, मा.जयंत संगीडवार ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ता,मा.मेहबुबखान पठाण जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता,सौ.वंदना गुरुनुले,माजी सरपंच,मा.पितांबर वासेकर माजी सरपंच व्याहाड बुज,सौ.अर्चना संगीडवार,ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्षा,मा.डोमा शेंडे,ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष,सोनापूर, मा.हिम्मत मोटघरे ग्रा.पं. सदस्य व्याहाड बुज,सौ.रुपाली करकाडे ग्रा.पं.सदस्य व्याहाड बुज,मा.जयंत संगीडवार,मा.संतोष नैताम,मा.जीवन गेडाम सामाजिक कार्यकतें,मा.बाबुराव मोटघरे, मा.शंकर मेश्राम सामाजिक कार्यकर्ते,मा.प्रकाश करकाडे पो.पा.व्याहाड बुज, आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here