आज भद्रावतीत   प्रा. श्याम मानव यांचे “लोकशाही पुढील आव्हाने ” या विषयावर जाहीर व्याख्यान

0
78

आज भद्रावतीत

प्रा. श्याम मानव यांचे “लोकशाही पुढील आव्हाने ”

या विषयावर जाहीर व्याख्यान

 

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान

 

चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरीत आम्ही भद्रावतीकर द्वारा आयोजित “लोकशाही पुढील आव्हाने” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील व्याख्याते प्रा. श्याम मानव (राजकीय विश्लेषक तथा संस्थापक संघटक अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती) यांचे जाहीर व्याख्यान दिनांक १४फेब्रुवारी २०२४ रोज बुधवार ला सायंकाळी ६ वाजता निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड पुरुषोत्तम सातपुते, अध्यक्षस्थानी, संविधान अभ्यासक अॅड भूपेंद्र रायपुरे राहणार आहेत. जगण्याचा आणि विकसित होण्याचा अधिकार आपल्याला ज्या संविधानाच्या माध्यमातून मिळाला कदाचित आपण ते विसरत आहोत का? सभोवतालची परिस्थिती आणि भविष्यातील समाज रचना आपण ओळखून आहोत का? आज देशासमोर मोठी संकटे उभी आहेत? आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य किती अंधारात आहे .देशाची राजकीय स्थिती काय आहे.आपल्याला संविधान हवे की ,दुसरे काही? आपण सर्व स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून वावरतो आहे खऱ्या अर्थाने आपण जागृत आहोत का? या सर्व बाबींवर अभ्यासपूर्ण विवेचन “भारतीय लोकशाही पुढील आव्हाने” या विषयावर आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील व्याख्याते प्रा.श्याम मानव विशेष मार्गदर्शन करणार आहे. सदर व्याख्यान कार्यक्रमाला युवा युवती संघटन ,नागरिकांनी व विविध सामाजिक स्तरावरील सर्व क्षेत्रातील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ .विवेक शिंदे ,डॉ. कार्तिक शिंदे भद्रावती शिक्षण संस्था, सहसंयोजक स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, भद्रावती पत्रकार संघ, अखिल भारतीय ग्रामीण संघ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here