निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा जाहीर लिलाव
यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र या कार्यालयामार्फत निरुपयोगी, निर्लेखित द्रवनत्र पात्रांचा 30 जानेवारी रोजी लिलाव करण्यात येणार आहे. निरुपयोगी द्रवनत्र पात्रे खरेदी करणाऱ्या खरेदीदार संस्था, कंपन्या, व्यापारींनी या लिलावात भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 201 पशुवैद्यकीय संस्थांना विर्यमात्रा जतन करण्यासाठी द्रवनत्र व द्रवनत्र पात्रे पुरवठा करण्यात येतात. जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, यवतमाळ येथून निरुपयोगी, निर्लेखन केलेली द्रवनत्र पात्रे विक्री करावयाची आहेत. ही पात्रे इच्छुक खरेदीदार संस्था, कंपन्या, व्यापारी यांना अवलोकनासाठी ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.यात द्रवनत्र पात्रांच्या तपशिलानुसार बीए-1.5 ची 6 पात्रे, बीए-3 ची 6 पात्रे, आयएन-50 ची 7 पात्रे, आयआर-3 ची 4 पात्रे, टीए-55 ची 32 पात्रे असे एकूण 55 द्रवनत्र पात्रे विक्रीला आहे. त्याकरीता 30 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, यवतमाळ वाघापुर रोड यवतमाळ येथे जाहीर लिलाव करण्यात येत आहे.
ज्या संस्था, कंपन्या, व्यापारी यांना निरुपयोगी द्रवनत्र पात्रे खरेदी करावयाची असतील अशा संस्थांनी, कंपनी, व्यापारी यांनी भाग घेण्यासाठी अनामत रक्कम सहा हजार रुपये रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यवतमाळ यांच्या नावे काढलेला किंवा रोख रक्कम भरणे आवश्यक आहे. जाहीर लिलावाच्या प्रक्रियेचा निर्णय, लिलाव समितीचा अंतिम राहील. विक्री करण्यात आलेल्या द्रवनत्र पात्राचे हस्तांतरण करण्यापूर्वी चेपुण टाकण्यात येतील, जेणेकरुन त्यांचा पुर्नवापर करणे शक्य होणार नाही. या लिलावाच्या इतर अटी व शर्ती कार्यालयात व पशुसंवर्धन खात्याच्या https://ahd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विजय राहाटे यांनी कळविले आहे.
000