आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत
* वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आक्रमक आंदोलन सुरू
* ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला समर्थन
* राजुरा येथे शेकडो नागरिक व महिला उतरल्या रस्त्यावर
राजुरा शहरातील पंचायत समिती जवळील संविधान चौक येथे आज 30 डिसेंबरला दुपारी बारा वाजतापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते आणि शेकडो विदर्भवादी सहभागी झाले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथील संविधान चौकात 27 डिसेंबर पासुन विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप यांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला समर्थन देण्याकरिता राजुरा येथे रास्ता रोको करण्यात आले. यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. आंदोलन शहरात असल्याने वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. आंदोलकांनी दिलेल्या जोरदार घोषणांमुळे हा भाग दणाणून गेला. शेतकरी संघटनेचे नेते हृ वामनराव चटप हे उपोषण करीत असल्याने त्यांच्या समर्थनार्थ शेकडो नागरिक आणि महिला आंदोलनात सहभागी झाल्या.
या आंदोलनात ॲड.मुरलीधर देवाळकर,ॲड.अरुण धोटे, पूर्व विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष कपिल इद्दे, सिद्धार्थ पथाडे, शेषराव बोंडे , प्रभाकर ढवस, पंढरी बोंडे, ॲड. राजेश लांजेकर, ॲड.निनाद येरणे, ॲड.राजेंद्र जेनेकर, राजू धोटे, मधुकर चिंचोलकर, ईश्वर देवगडे, घनश्याम दोरखंडे, सुरेश आस्वले, आबाजी ढवस, सुभाष रामगिरवार, सिंधुबाई लांडे, सुचिता मावलीकर, दीपाली हिंगाने, प्रा.मनीषा चटप, प्रणाली मडावी, छाया घटे, किरण बावणे,उज्वला नळे, दीपिका जुलमे, पौर्णिमा रामटेके, लता कुळसंगे, चंद्रकला लोखंडे, सुनीता भोगेकर, रोहिणी लांडे,गुलाबी कुळमेथे, संगीता बोबडे, सुधा बोबडे, नालिंदा कोडापे, सचिन कुडे, सागर तोटावार, मधुकर नरड, विशाल लांडे, डॉ. गंगाधर बोढे, मंगेश मोरे, दिलीप देठे, राहुल बानकर, बंडू कोडापे, विलास बोबडे, संतोष बावणे, राज पाटील, रमेश रणदिवे, सुरज गव्हाणे, देवा पडोळे, निखिल बोंडे, विजय मिलमिले, दिनकर डोहे दिलीप देठे, आबाजी धानोरकर, नरेश गुरनुले,प्रफुल कावळे,सुरज जीवतोडे, गणपत काळे,श्रीहरी डाखरे, नामदेव दुधे, बंडू देठे, भाऊजी कन्नाके, सत्यपाल देवाळकर, शामराव काटवले,जुबेर शेख, हसन रिजवी,भाऊराव पोटे यांचेसह शेकडो कार्यकर्ते, नागरिक व महिला सहभागी झाल्या.
हे आंदोलन दुपारी 12 वाजता सुरू होऊन दिड वाजेपर्यंत चालले. अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटविल्यावर रस्ता मोकळा झाला. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आंदोलन स्थळी राजुरा ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.