भारतीय लोकशाही धोक्यात असून, लोक उघडपणे बोलायला घाबरत आहे
-प्रा. श्याम मानव
—————————————-
“कदाचित २०२४ ही शेवटची निवडणूक ठरू शकेल ”
—————————————-
वेळिच सावध होत
सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटित राहून लोकशाहीला शाबूत ठेवण्याची नितांत गरज असल्याचे प्रा.श्याम मानव यांनी आम्ही भद्रावतीकर द्वारा आयोजित “लोकशाही पुढील आव्हाने” व्याख्यान कार्यक्रमात निर्भीड वक्तव्य
—————————————-
गेली कित्येक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करताना व त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळीत प्रबोधनाचे धडे गिरवीत मार्गदर्शन करीत
भारतभर हिंडत असताना मी दिल्लीमध्ये जात असेल तेव्हा सगळ्या पत्रकारांना सांगत असे महाराष्ट्र फार वेगळा आहे संत ज्ञानदेव ,तुकाराम पासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाचा वैराग्यमूर्ती गाडगे बाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा शाहू -फुले आंबेडकरांचा आणि कुशल प्रशासक छत्रपती शिवरायांच्या जिजाऊ चा हा महाराष्ट्र आहे आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आजमीतिला घडतंय ते इतक वाईट आहे की, हा कोणता महाराष्ट्र हेच कळत नाही. आपल्या देशामध्ये लोकशाही अजून शिल्लक आहे काही विचार स्वातंत्र्य आणि बोलण्याचा स्वातंत्र्य अजून कायदेशीर रित्या थांबवलं गेलेलं नाही.
लवकरच काही दिवसात निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकीमध्ये जे पक्ष असतील सत्ता स्थानी असतील किंवा विरोधामध्ये असतील त्यांच्याविरुद्ध सभ्य भाषेत टीका करण्याचा प्रत्येक नागरिकाला घटनादत्त अधिकार आहे.
तो कोणालाही हिरावून घेता येणार नाही.
राज्य देशपातळीवर गेली ३५
वर्षापासून विविध विषयासंदर्भात मीडियातील वाहिनीच्या माध्यमातून निर्भीडपणे मांडणी करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते विशंभर चौधरी, अॅड असीम सरोदे यांच्यावर भर चौकात पुण्यात प्रत्येक ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला. या घटनामुळे लोकशाही कुठे शिल्लक राहिली असा प्रश्न आजच्या घडीला उद्भवतो आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून लोकशाहीला प्रचंड धोका निर्माण झालेले चित्र दिसून येत आहे.
ती येणाऱ्या लोकशाही मधील धोक्याची घंटा आहे ही सर्व बाब लोकशाहीतील प्रत्येक नागरिकांनी समजून घेतली पाहिजे असे स्पष्ट मत आम्ही भद्रावतीकर द्वारा आयोजित “लोकशाही पुढील आव्हाने” व्याख्यान कार्यक्रमात राजकीय विश्लेषक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक व संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. निळकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालयातील खुल्या प्रांगणात भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तथा भद्रावती पत्रकार असोसिएशन द्वारा आयोजित कार्यक्रमात प्रा. श्याम मानव प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याता म्हणून बोलत होते .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. भूपेंद्र रायपुरे संविधान अभ्यासक, ज्येष्ठ विधीतज्ञ, भद्रावती तर प्रमुख अतिथी म्हणून अॅड पुरुषोत्तम सातपुते ज्येष्ठ विधीतज्ञ चंद्रपूर, विशेष अतिथी म्हणून अॅड गोविंदराव भेंडारकर, अ.भा.अं निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, तथा माजी जि .प.उपाध्यक्ष चंद्रपूर, सुरेश झुरमुरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा(PIMC) सदस्य महाराष्ट्र शासन, डॉ .विवेक शिंदे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था प्रामुख्याने विचार मंचावर उपस्थित होते. प्रसंगी प्रा . श्याम मानव यांचा डॉ .विवेक शिंदे यांनी भद्रावती शिक्षण संस्थेच्या वतीने शाल शीफळ सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्षस्थानी अॅड भूपेंद्र रायपुरे ,प्रमुख अतिथी अॅड पुरुषोत्तम सातपुते यांचा भद्रावती शिक्षण संस्थेच्या वतीने प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सचिव, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके ,प्रा जयंत वानखेडे, प्राचार्य एम यु बर्डे आदींनी सन्मान केला. सन्मानचिन्ह प्रदान करीत सत्कार केला. प्रसंगी संयोजक अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ द्वारा महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख ,जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक यांनी प्रसिद्ध व्याख्याते मुख्य मार्गदर्शक प्रा.श्याम मानव यांना पत्रकार संघाचे सन्मानचिन्ह प्रदान करीत सत्कार केला. श्रीनिवास शिंदे चॅरिटेबल रवींद्र शिंदे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष प्रा.धनराज आस्वले , भद्रावती तालुका पत्रकार असोसिएशन द्वारा अध्यक्ष विनायक येसेकर, दिलीप ठेंगे ,राजू गैनवार ,पुरोगामी पत्रकार संघातर्फे प्रवीण चिमूरकर, प्रा.हटवार सर अ. भा. ग्रा.पत्रकार संघातर्फे प्रा .भूषण वैद्य, किशोर पत्तीवार कार्यकारी मंडळ आदींनी सन्मान केला . सन्मान प्रक्रियेत वाईस ऑफ मीडिया, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, उत्कर्ष पुरोगामी महिला व बालकल्याण संस्था च्या वतीने वनिता घुमे वसर यांनी सन्मान केला प्रसंगी व्याख्यान कार्यक्रमात डॉ. स्वप्ना सिंधू मुरार यांच्या “मेरा मास्टर माईंड , टीम सुपर माईंड” प्रा .शाम मानव यांची प्रस्तावना ,आई-वडिलांची नाम मुद्रा असलेला व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणाऱ्या ग्रंथ प्रकाशन कथासंग्रहाचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . प्रसंगी उपस्थित अतिथी व अध्यक्ष महोदयांनी मान्यवरांनी विविध विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक मनोगत डॉ .विवेक शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.मोते तर कृतज्ञता आभार रवींद्र तिराणिक यांनी केले .
“लोकशाही पुढील आव्हाने “व्याख्याण्याच्या मुख्य मार्गदर्शन प्रसंगी मानव सर म्हणाले गेल्या कित्येक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये काम करताना अनेक प्रक्रियेंना व आव्हानांना तोंड देत समोर जावं लागलं, त्यानंतर जादूटोणा विरोधी कायदेविषयक विधेयक पारित होऊन कायद्यात रूपांतर झाले . सविस्तरपणे कायदेशीर माहिती पोलीस प्रशासन यांना देत आलो आहे .यातून आता अनेक आव्हानात्मक प्रकरणे बाहेर पडत आहेत . हे खऱ्या अर्थाने जादूटोणा विरोधी विधेयक कायद्याचे फलित आहे .अनेक काळापासून मनुस्मृतीवरही विचार आजच्या घडीला कालबाह्य होताना त्या मुळाच्या शेवटच्या खोलात जाऊन सविस्तरपणे विश्लेषण करीत मुद्देसूद प्रकाश टाकला. संविधान व घटना प्रस्तावनेमध्ये म्हटलं आहे .सामाजिक ,आर्थिक, न्याय याचा अर्थ या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला जो कोणत्याही जातीचा असेल, जो कोणत्याही धर्माचा असेल, जो कोणत्याही लिंगाचा असेल म्हणजेच स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ज्याला सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही न्याय देऊ ,त्यांच्याबद्दलचा न्याय प्रस्थापित करू, विचार अभिव्यक्ती विश्वास धर्म जी स्वतंत्रता आहे .विचार व्यक्त करण्याची म्हणजेच “अभिव्यक्ती “विचार करण्याची स्वतंत्रता आमची जी काही श्रद्धा असेल त्याप्रमाणे धर्म मानण्याची किंवा न मांनण्याची स्वतंत्रता जी उपासना आम्हाला करावेसे वाटते तीच स्वातंत्रता आणि संधीची समानता, आम्ही कोणत्याही धर्मामध्ये किंवा जातीमध्ये जन्माला आलो असलो तरी सगळ्यांना स्त्री-पुरुषांमध्ये समानता व प्रतिष्ठा जीवन जगण्याची समान संधी मिळेल. व्यक्तीची गरिमा व राष्ट्राची एकता अखंडता बंधुता सुनिश्चित करणारी विविध धर्मामध्ये समानता हे स्वप्न आमच्या घटनाकारांनी पाहिलं .
मला बोलण्याचा स्वातंत्र्य अभिमत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानातील घटनेने दिला आहे. यापुढे जाऊन मानव सर म्हणाले
या संदर्भात माणूस म्हणून बोलताना शूद्र म्हणून माझी ओळख आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले .याप्रसंगी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र कालावधीनंतरचा विचार विमर्श राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर लोकमान्य टिळकांची वैचारिक ओळख, आणि नथुराम गोडसे यांचा हिंसात्मक विचारही व्याख्यान प्रसंगी मांडला . इंदिरा गांधींची आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा काळ व त्यानंतर वेगवेगळ्या आंदोलनात अनेक मित्र समवेत दहा महिने भोगेला तुरुंगवास याची आठवण करून देत देताना मुद्देसूद विश्लेषण केले . याप्रसंगी इतिहास पूर्व काळात जाऊन शाहू महाराजांचा, प्रबोधनकार ठाकरे यांचा विचारावरही प्रकाशझोत टाकला . हिंदू हदय सम्राट हृदयस्पर्शी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे या कालावधीत झालेले वादळी कार्यक्रम याची आठवण करून दिली. त्यानंतर आलेला वैचारिक विचार व समाज प्रबोधनाची कास सगळ्यांनीच नम्र पूर्वक जाणून घेतली. त्यानंतर माझ्या संदर्भातील आक्रमक भूमिका शिथील झाल्या हे विशेष.
सध्या काही वर्षापासून, संभाजी भिडे गुरुजी नावाचे वादळी व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रातील गुरुवर्य म्हणून प्रचंडपणे सातत्याने वेगवेगळ्या शैलीतून महात्मा गांधी बरोबरच थोर विभूती व्यक्ती यांच्या प्रति दिशाभूल करणारी तथ्य नसलेले विचार पेरीत आहे . व त्याला पाठराखंन करीत शाब्बासकी देण्याचा काम शासनात असणारे राज्यकर्ते करतात हे अत्यंत चुकीचे आहे.
गेले आठ नऊ वर्षात ईडी व सीबी चा दुरुपयोग कसा सुरू आहे याचाही विविध दाखले व उदाहरणे देत सविस्तरपणे भाष्य केले. या प्रक्रियेत ज्येष्ठ पत्रकार व शिवसेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात घडलेल्या सविस्तर गोप्यपूर्ण खुलासा व मांडणी करीत ईडी व सीबी चा केंद्र शासनाने चालविलेला एककलमी कार्यक्रम सविस्तरपणे याप्रसंगी प्रा. श्याम मानव यांनी उघड केला. भारत देशाचे सध्याचे आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान यांनी लोकहित व धोरणात्मक कसे एकसूत्री अट्टहासी कार्यक्रम राबविले व सध्या अनेक विविध राबविले जात आहेत त्याचा पाडाच वाचला व सविस्तरपणे विश्लेषणात्मक बाजू मांडली . पंतप्रधानांनी घेतलेले तीन निर्णय किती भयानक आहेत डिझेलच्या पेट्रोल महागाई, नोटबंदी यावरही प्रकाश टाकला. संपूर्ण भारतात कोविड परिस्थितीत जनतेचे विदारक चित्र संपूर्ण भारताने भारतातील नागरिकांनी स्वतः अनुभवले किंबहुना महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे महाराष्ट्राची बाजू कोविड परिस्थितीत योग्यपणे सांभाळली हे महत्त्वाचे होते. मानव सरांनी ईव्हीएम मशीन संदर्भात बोलताना ईव्हीएम मशीन मध्ये कशी चालाकी असू शकते असे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले.
हे माझे मत नसून निवडणूक आयोगाचे तत्कालीन निवडणूक आयोग प्रमुख अधिकारी संबंधित क्षेत्रात असलेले तज्ञ मित्र यांचे मत आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. गेले काही वर्ष जे चित्र उभे राहत आहे.
सध्याच्या परवापासून ते आजतागत परिस्थितीत सुरू असलेली ईडी व सीबी ची धडक प्रत्येक राजकारण्यांच्या मनात धडकी भरवणारी प्रक्रिया असून केंद्र सरकारच्या हिटलर हुकूमशाहीचे प्रतीक आहे असे म्हणावे लागेल. असे निर्भयपणे भाष्य करताना आता कुठेतरी हे सर्व थांबायला हवे ! सर्व सामान्य नागरिकांच्या मनात लोकशाहीमध्ये खरी लोकशाहीची जोपासत ठेवायची असल्यास आता बदल घडवल्याशिवाय पर्याय नाही .आता बदल घडवण्याची हीच वेळ योग्य आहे ती तुमच्या सुद्धा विवेक बुद्धीतून ईव्हीएम मशीन मध्ये नव्हे ! तर मताच्या पेटीतून शाबूत ठेवा असा संदेश लोकशाही पुढील आव्हाने या व्याख्यान कार्यक्रमादरम्यान प्रा. श्याम मानव यांनी केला. भारतीय लोकशाही धोक्यात आली असून लोक उघडपणे बोलायला घाबरत आहेत .देश हिटलरशाहि विचार प्रक्रियेकडे कडे वेगाने जात आहे .२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ही लोकशाहीची शेवटची निवडणूक असेल, यानंतर या देशात पुन्हा निवडणूक होईल की नाही, असे खुले मत प्रा.श्याम मानव यांनी व्यक्त केले. “भारतीय लोकशाही पुढील आव्हाने” या व्याख्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही भद्रावतीकर द्वारा आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते.