सिटू च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा

0
22

नुकताच शासनाने राम मंदिराचे अयोध्येला उद्घाटन केले, तसेच राम मंदिराचा सोहळा देशभरात साजरा करण्यात आले. एक प्रकारे दिवाळी साजरी करण्यात आली. शासनाने केलेले या दिवाळीचा आम्ही आशा व अंगणवाडी संघटना(सिटू संलग्न) विरोध करत आहोत. लाखो करोडो रुपये मंदिर बांधताना खर्च करणाऱ्या केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत आहोत. आधी योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, आशा वर्कर व गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचारी यांना किमान राज्य शासनाने जाहीर केलेल्या मानधन वाढीच्या निर्णयाचा जीआर काढा. त्यासाठी १२जानेवारी २०२४ पासून पुन्हा आशा व गटप्रवर्तकांचा संप करण्यात आला आहे. मागील संपात फक्त २३दिवस व शासनाने संप काळातील बॅकलॉगच्या कामावर काम केले. आशांनी काम करून दिल्यास मानधन कपात होणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु पूर्ण ऑक्टोबर महिन्याचा मानधन व इतर निधी कपात करण्यात आला. त्यामुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मानधन कपात करून शासन हे आशा व गटप्रवर्तकांना खोटे आश्वासन देत आहे. फुकट काम करून घेत आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आम्ही सध्या या संपाविषयी खालील मागण्यांविषयी आग्रही आहोत

१. मागील काळात गोल्डन कार्ड आधार इत्यादी कामाचा तीन वर्षाचा मोबदला दिला नाही.

२. अशा व गटप्रवर्तकांना दिवाळीपूर्वी २००० बोनस देऊ असा आश्वासन दिले ते दिले नाही.

३. आशांना ७ हजार व गटप्रवर्तकांना १० हजार मानधन वाढ करू, तरी या आश्वासनाचा जीआर काढला नाही.

आम्ही या सगळ्याचा निषेध करत आहोत व पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करू असे सिटुचावतीने जाहीर करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here