धान खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

0
33

धान खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 17: पणन हंगाम 2023-24 खरीप मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी नोंदणीकरीता 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

तसेच नोंदणी करताना ज्या शेतकऱ्याचा सातबारा आहे, त्याच शेतकऱ्याचे प्रत्यक्ष छायाचित्र अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. तिवाडे यांनी केले आहे.

 

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here