*देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ*. *मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर*

0
22

मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

 

महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी ही शपथ घेतली आहे.

 

मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

 

देवेंद्र फडणवीसच ‘पुन्हा’ मुख्यमंत्रिपदी का? भाजपने या निर्णयासाठी एवढा वेळ का घेतला?

5 डिसेंबर 2024

महायुतीच्या बाजूने ‘त्सुनामी’सारखा निकाल येईल याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना का आला नाही?

 

या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

 

तसेच देशभरातील बहुतांश भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली.

 

,एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख केला. राज्यपालांनी थांबवल्यानंतर त्यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

 

 

एकनाथ शिंदे अखेर महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले आहेत.एकनाथ शिंदे अखेर महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले आहेत.

 

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद आपल्याकडे यावं यासाठी एकनाथ शिंदेनी प्रयत्न केले होते. मात्र भाजपने कुठलीही तडजोड न करता राज्याचे प्रमुखपद स्वतःकडे राखण्यात यश मिळवलं आहे.

 

एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर दिल्लीत झालेल्या बैठकीत शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबत भाजपने कळवल्याचं बोललं गेलं. त्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतले आणि थेट त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी गेले होते.

 

एकनाथ शिंदेंच्या तब्येतीमुळे महायुतीच्या त्यादिवशीचा बैठकाही रद्द झाल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी एकनाथ शिंदे मुंबईत परतले होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री बनले आहेत. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याचे प्रमुख म्हणून शपथ घेतली आहे.

 

.*मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर*

 

*पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत*

 

मुंबई, दि.५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.

 

पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.

 

चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here