*खरे वृत्तांत दिवाळी विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन…*
*प्रसार माध्यम ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे … सुधीर भाऊ मुनगंटीवार*
प्रसार माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे भारतामध्ये लोकशाही मुल्य रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य प्रसार माध्यमाद्वारे करण्यात येते आहे जनसामान्यांचे प्रश्न शासनासमोर मांडण्याचे व सोडविण्याचे महत्त्वाचे कार्य खरे वृत्तान्त न्यूज पोर्टल तथा यूट्यूब चैनल त्याचा अर्थ साप्ताहिक च्या माध्यमातून सोडवण्याची कसोशीने प्रयत्न केले आहे व समाज जडणघडण मध्ये प्रसार माध्यमांची भूमिका ही शासनाला मार्गदर्शन करण्याचे व शासन चुकत असल्यास शासनाला धारेवर धरताना मागेपुढे न बघता राष्ट्र उभारणीचे कार्य प्रसार माध्यमाद्वारे सतत केली जात आहे खरे वृत्तांत दिवाळी विशेषांक 2024 ला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा …
चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अमरावती,जिल्ह्यात खरे वृत्तांतने आपल्या वृत्ताच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न घेऊन त्यांना सर्वसामान्यपणे न्याय देण्याचा कार्य केले खरे वृत्तांत न्यूज नेटवर्कची लोकप्रियता घराघरात पोहोचविली पुरोगामी पत्रकार संघ (भारत) व महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव निलेशजी ठाकरे चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात खरे वृत्तांत दिवाळी विशेषअंक तयार करण्यात आलेला आहे व या खरे वृत्तांत दिवाळी विशेषांकचे विमोचन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आहे.
बल्लारपूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला विशाल रंगारी जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत काशिनाथ सिंह बल्लारपूर तालुका प्रतिनिधी संजय हाटे उपजिल्हा प्रतिनिधी या सह अनेक पदाधिकारी आदी उपस्थित होते.
खरे वृत्तांत दिवाळी विशेषांक 2024 वरून प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे व भारतामध्ये लोकशाही मूल्य रुजविण्याचे महत्त्वाचे प्रसार कार्य प्रसार माध्यमांद्वारे करण्यात येते व जनसामानचे प्रश्न शासनासमोर मांडायचे सोडवण्याचे महत्त्वाचे कार्य आपल्या या खरे वृत्तांत न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून केले जावे विश्वास व्यक्त करीत जिल्ह्यामध्ये खरे वृत्तांत न्यूज नेटवर्क तर्फे सामाजिक उपक्रमातून केलेली कामे ही स्तुतनीय आहे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी गौरवउद्गार केले.
खरे वृत्तांत दिवाळी विशेषांक २०२४ च्या माध्यमातून बेरोजगारांना एक व्यवसायभीमूख रोजगाराची संधी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक जिल्हा आत्मा प्रकल्प संचालक, उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा यांचा *दुधी भोपळ्याच्या अप्रतिम कलाकृती तुंबा आर्ट* लेख हा मार्गदर्शक ठरणार असून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे यांसह दिवाळीचे विविध व्यंजनांसह मान्यवरांचे पत्रकारितेवर तथा डिजिटल मीडिया या विषयावर विशेष लेख व खरे वृत्तान्त न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून १ जनवरी ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान झालेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सुद्धा या दिवाळी विशेषांका मध्ये दिसणार असून बेरोजगारीवर मात करण्याकरिता व सुमित डिजिटल मीडिया चे संचालक देवनाथ गंडाटे जी साजरी करूया डिजिटल दिवाळी
डिजिटल मीडिया म्हणजे काय अध्यात्म या विषयासह समाजात नित्य घडत असलेल्या ज्वलंत प्रश्नावरील निलेशजी ठाकरे विनोद देशमुख विजय भाऊ सिद्धावार यांचे हे विशेष लेख यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे तो सर्वांसाठी व्यापक ठरेल असे मत संपादक मोरेश्वर उद्योजवार यांनी व्यक्त केले