*चंद्रपूर – गडचिरोली संपादक – पत्रकार संघच्या वतीने पत्रकार दिन साजरा*

0
86

*चंद्रपूर – गडचिरोली संपादक – पत्रकार संघच्या वतीने पत्रकार दिन साजरा*

 

*विविध क्षेत्रातील उल्लेखनीय, उत्कृष्ट, निर्भीड व प्रामाणिकतेने कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार*

 

विदर्भ केसरी / डी. एस. ख्वाजा

 

चंद्रपूर /- दिनांक ८ जानेवारी रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व सभागृह, चंद्रपूर येथे सायंकाळी ४ वाजता

चंद्रपूर – गडचिरोली संपादक – पत्रकार संघच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डी. एस. ख्वाजा ( उपसंपादक – विदर्भ केसरी ), कुमार जुनमलवार ( संपादक – साप्ताहिक कुमार दर्पण ), रकिब शेख ( संपादक – साप्ताहिक कोल सिटी खबर ), मोरेश्वर उधोजवार ( संपादक – अर्ध साप्ताहिक खरे वृत्तांत ) यांच्या वतीने करण्यात आला होता. चंद्रपूर – गडचिरोली संपादक – पत्रकार संघच्या वतीने मागील १० वर्षा पासून ८ जानेवारी रोजी हा कार्यक्रम सत्त आयोजित करण्यात येत असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्हेचे संपादक व पत्रकार या कार्यक्रमात मोठ्या संख्येत सामील होतात. निर्भीड व प्रामाणिकतेने कार्य करणाऱ्या संपादक, पत्रकार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे मान्यवरांचा सम्मान, सत्कार व त्यांना प्रोत्साहित करने, त्यांना जनतेपुळे आणने तसेच त्यांना बळकट करण्या करिता हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करण्यात येते.

कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी राजेश सोलापण ( अध्यक्ष – महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ ), उदघाटक आशिष माशीटकर, प्रमुख उपस्थिती ऍडव्होकेट नवाज शेख, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद कुमार तिवारी, राजू कुकडे ( संपादक -भूमी पुत्राची हाक ), अनिल देठे ( संपादक – विदर्भ समाचार ) प्रशांत विघ्नेश्वर ( अध्यक्ष – श्रमिक पत्रकार संघ ) मंच्यावर उपस्थित होते. सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली तसेच दीप प्रजवलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना रकिब शेख यांनी दिल. या कर्यक्रमात विविध क्षेत्रातील निष्ठेने व प्रामाणिकतेणे कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ज्यामध्ये विनोद कुमार तिवारी (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), सरेंद्र तिवारी (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), वैष्णवी चिनाला ( गुणवंत छात्रा ), नंदा बिहाडे ( सामाजिक कार्यकर्ता ), राजश्री शिंदे ( सामाजिक कार्यकर्ता), सुनील गेडम ( पत्रकार ), अमान कुरेशी ( पत्रकार ) यांचा सत्कार पुष्पगुछ, शाल व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.

सदर कार्यक्रमात चंद्रपूर व गडचिरोली क्षेत्राचे नामवंत प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडया आणि पोर्टल मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नौशाद शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल देठे यांनी केले. कार्यक्रमची सांगता राष्ट्रगान पठण करून करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here