संविधान सन्मान रॅलीला सावली तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद
रॅलीदरम्यान अनेकांनी केला पक्षप्रवेश
वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर (पुर्व) च्या वतीने जिल्हयाच्या पुर्व विभागात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सावली तालुक्यात प्रथमत: रॅलीचे आगमन झाले. या सविधान सन्मान रॅलीचे सावली नगरात भव्य स्वागत करण्यात आले. म. फुले यांच्या पुतळयाला मालार्पन करुन शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीचे सभेमध्ये रुपांतर होवून समाजभवन येथे सभा पार पडली. या संविधान सन्मान रॅलीचे मुख्य मार्गदर्शक जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव शैलेंद्र बारसागडे, जिल्हा महासचिव मधुकर वानखेडे, जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी उल्काताई गेडाम, तालुका अध्यक्ष भास्कर आभारे, शहर अध्यक्ष रोशन बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष युवक आघाडी अनिकेत गोडबोले, तालुका अध्यक्ष विना गडकरी, सपना दुधे, राणी मोटघरे, शालु रामटेके, किरण गेडाम, चंद्रभागाबाई गेडाम, यशोधरा डोहणे, संजय घडसे, नितीन दुधे, मुकेश दुधे, बंडु मेश्राम, महादेव लाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी संविधान सन्मान रॅली ही तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून संविधानाचे महत्व पटवून सांगितले, संविधानाची गरज का आहे या विषयी मार्गदर्शन केले. ही संविधान रॅली सावली तालुक्यातील घोडेवाही, सिंदोळा, उसेगाव, जिबगाव, जांब बु., केरोडा, व्याहाड बुज., कापसी, निमगाव या गावांना भेटी देवून सभा घेण्यात आली. रॅली दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲङ प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कापसी येथील माजी ग्रा.पं. सदस्य मंगलदास उराडे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. यात महेंद्र उराडे, दिवाकर मेश्राम, नवाब मोहूर्ल, अमन रामटेके, रोशन लाकडे, बंडू लाकडे, सोमेश्वर मोहूर्ले, प्रज्वल उराडे, छोटी रामटेके, प्रदिप बांबोळे, पोर्णीमा बांबोळे, भूमिका उराडे, शेवंता मेश्राम, जोत्सना शेंडे, सपना मोहूर्ले, सोनी लाकडे, प्रकाश खोब्रागडे, ज्योती बांबोळे, डोमाजी मोहूर्ले यांचा समावेश आहे. मौजा निमगाव येथे संविधान सन्मान रॅलीचा समारोप करण्यात आला.