निखिल भाऊ सुरमवार यांच्या हस्ते रबरी बॉल क्रिकेट उद्घाटन सोहळा संपन्न..
भारतात बर्याच वर्षांपासून क्रिकेटचा खेळ खेळला जात आहे, तो एक अतिशय प्रसिद्ध आणि रोमांचक खेळ आहे. हा खेळ मुलांना खूप आवडतो, सहसा लहान मैदान, रस्ते इत्यादी कोणत्याही लहान मोकळ्या जागांवर क्रिकेट खेळण्याची त्यांना सवय असते. मुलांना क्रिकेट व त्यासंबंधीचे नियम व कायदेविषयक माहिती खूप आवडते. भारतातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणार्या खेळांपैकी क्रिकेट सर्वात प्रसिद्ध आहे. लोकांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता इतकी जास्त आहे की हा खेळ पाहण्याकरिता प्रेक्षकांची गर्दी इतर कोणत्याही खेळाकडे फारच कमी जाते.
क्रिकेट हा एक व्यावसायिक पातळीवरील मैदानी खेळ आहे जो बर्याच देशांकडून खेळला जातो. या मैदानी खेळामध्ये 11 खेळाडूंचे दोन संघ आहेत. 50/20 षटक पूर्ण होईपर्यंत क्रिकेट खेळले जाते. यासंदर्भातील नियम आणि कायदे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि मर्लबॉर्न क्रिकेट क्लबद्वारे शासित व नियमन केले जातात. हा खेळ कसोटी सामने आणि एकदिवसीय आणि टी -20 आंतरराष्ट्रीय सामने म्हणून खेळला जातो. हा खेळ प्रथम 16 व्या शतकातील दक्षिण इंग्लंडमध्ये खेळला गेला. तथापि, 18 व्या शतकाच्या दरम्यान ते इंग्लंडच्या राष्ट्रीय खेळामध्ये विकसित झाले
खालच्या स्तरापासून लहान खेळाडू मोठे खेळाडू निर्माण व्हावे या उदात्त हेतूने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधतश्री शिवछत्रपती युवा बहुउद्देशीय संस्था व्याहाड बुज.च्या वतीने आज व्याहाड बूज. येथे भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते .
या क्रिकेट सामन्यामध्ये प्रथम बक्षीस ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजय भाऊ वडेट्टीवार यांचे तर्फे प्रथम बक्षीस १ लाख रुपये तर द्वितीय पुरस्कार खासदार अशोकजी नेते साहेब यांच्यातर्फे 71 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 41 हजार रुपये असे आहे.
या क्रिकेट सामन्याचे आज दि. १५ फरवरी रोजी उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिलभाऊ सुरमवार यांच्या हस्ते पार पडले . या उद्घाटनाचे अध्यक्ष किसान सहकारी तांदूळ गिरणी चे अध्यक्ष सुनील बोमनवार हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून या उद्घाटनाला लाभलेले महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावलीचे अध्यक्ष अनिलभाऊ गुरनुले , सामाजिक कार्यकर्ते दीपक गद्देवार , जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते जयंत भाऊ संगीडवार , संदीप इंगुलवार , सुरेशजी वाढई , ओमप्रकाश सहारे , उपसरपंच परशुराम भोयर , ग्रा. प. सदस्य धनू गुरनुले , दिवाकर म्याकलवार आदी मान्यवर उपस्थित होते.