चंद्रपूर जिल्हा भाजपा महानगर पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर* 

0
58

*चंद्रपूर जिल्हा भाजपा महानगर पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर*

 

*जिल्हाध्यक्ष राहूल पावडे यांनी केली घोषणा*

 

चंद्रपूर, दि. १६ : भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर श्री. राहूल पावडे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांची नावे जाहीर केली आहे. भाजपा जिल्हा चंद्रपूर महानगर, महिला मोर्चा, युवा मोर्चा, विविध आघाडी प्रमुख आणि मंडळ अध्‍यक्षांचा समावेश आहे.

 

*भाजपा जिल्हा चंद्रपूर महानगर महामंत्री पदावर प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले यांची नियुक्ती करण्यात आली आहे .* सविता कांबळे या भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा असतील. महामंत्री पदावर शिला चव्‍हाण, सुष्‍मा नागोसे, कल्‍पना बगुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर महानगरचे विशाल निंबाळकर हे अध्यक्ष असतील. युवा मोर्चा महामंत्री पदावर सुनिल डोंगरे, प्रमोद क्षिरसागर, क्रिष्‍णा चंदावार, गणेश रामगुंडेवार, सतिश तायडे, नरेंद्र बोपचे यांची निवड करण्यात आली आहे.

 

भाजपा जिल्हा चंद्रपूर महानगर भाजपाच्या आघाडी प्रमुखांच्या नावांची घोषणा जिल्हाध्यक्ष राहूल पावडे यांनी केली आहे. ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी मनोज पोतराजे यांची निवड करण्यात आली आहे. धम्‍मप्रकाश भस्‍मे हे अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष असतील. अनुसूचित जमाती आघाडीच्या अध्यक्षपदाची धनराज कोवे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चॉंदभाई पाशा यांचे नाव अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदासाठी निवडण्यात आले आहे. रवी चहारे हे किसान आघाडीचे अध्यक्ष असतील.

 

भाजपा जिल्‍हा चंद्रपूर महानगर मध्‍य मंडळ अध्‍यक्ष पदी सचिन कोतपल्‍लीवार, दक्षिण मंडळ अध्‍यक्ष पदी संदिप आगलावे, पूर्व मंडळ अध्‍यक्ष पदी दिनकर सोमलकर, उत्‍तर मंडळ अध्‍यक्ष पदी पुरुषोत्‍तम सहारे व पश्चिम मंडळ अध्‍यक्ष पदी रवी लोणकर यांची निवड करण्‍यात आली आहे.

 

नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगराचे जिल्‍हाध्‍यक्ष राहूल पावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रा.) हरिश शर्मा, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, अॅड. संजय धोटे, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, सुदर्शन निमकर, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, रमेश राजूरकर आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here