28 फेब्रुवारी रोजी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत शिबिराचे आयोजन
Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.12: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एक दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर बुधवार,दि.28 फेब्रुवारी 2024 रोजी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 18 जुन 2019 च्या शासन निर्णयानुसार मधकेंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे. या योजनेतंर्गत महिला, युवक-युवती, सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, ज्येष्ठ, नागरीक, अनुसूचित जाती-जमाती, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहायता युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भुमीहीन, पारंपारीक कारागीर आदी समाजातील सर्वच घटकांना या योजनेचा लाभ देय आहे.
याशिवाय, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आदी योजनाही महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येतात. या शिबीरामध्ये कृषि, वनविभाग, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयाचा सहभाग असणार आहे. अधिक माहितीकरीता 9373287057/9322789232 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
00000