*रेती तस्करीत ट्रॅक्टरसह आरोपीला अटक*
वरोरा (सं.). जिल्ह्यातील रेती घाटांचे डेपो लिलाव झाले असले तरी रेतीचे डेपो अद्याप रेती विक्रीस सुरू झाले नसून बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने काही रेती घाटांवरून छुप्या पद्धतीने रेतीची चोरी होत आहे. याला आळा घालण्यासाठी महसूल विभागा प्रमाणे पोलीस विभागही सज्ज झाले आहेत. पोलीस विभागाच्या वतीने रेती तस्करांवर करडी नजर ठेवली जात असून आज सकाळी 11 वाजता डीबी इंचार्ज एपीआय योगेंद्रसिंग यादव यांनी वाळू तस्करीत असलेला ट्रॅक्टर जप्त करून आरोपीस अटक केली आहे. या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दनानले आहे.
आज सकाळी आरोपी जितेंद्र बुधराम वर्मा रा.नायगाव, वरोरा याने ट्रॅक्टर क्र. एमएच 34 सीडी 8554 मध्ये करंजी घाटातून वाळू भरून घेऊन जात होते. ही माहिती मिळताच एसडीपीओ नयोमी साठम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्या नेतृत्वात डीबीआय इन्चार्ज एपीआय योगेंद्रसिंग यादव, पो.कॉ.महेश गावतुरे यांनी वाळू भरलेल्या ट्रॅक्टरसह 10.10 लाख रुपयांचा माल जप्त केला.