राष्ट्रीय युवा पुरस्काराकरीता पात्र युवकांकडून अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 09 : केंद्र शासनाने राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2021-22 साठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, जिल्ह्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी पात्र युवकांकडून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहे. याकरीता www.yas.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
००००००