पालकांनी एक महिन्याच्या आत संपर्क साधावा अन्यथा दत्तक मुक्त घोषित करणार

0
28

पालकांनी एक महिन्याच्या आत संपर्क साधावा अन्यथा दत्तक मुक्त घोषित करणार

 

 

 

 

चंद्रपूर,दि.09 : काळजी व संरक्षणाची गरज असलेले 13 वर्षीय बालक रोहित पप्पू यादव तसेच 9 वर्षीय राहुल पावना साहु ही बालके चंद्रपूर बालकल्याण समितीच्या आदेशान्वये, स्वामी विवेकानंद बालगृह, राजुरा येथे दाखल आहे. सदर बालकांनी त्याचा पत्ता चंद्रपूर सांगितल्याने त्यांना चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे त्या बालकाच्या पत्त्याचा शोध घेतला असता तसेच चौकशी केली असता त्याचे आई-वडील दिलेल्या पत्त्यावर मिळून आले नाही. शेजारी संवाद साधला असता बालकाचे आई-वडील व कुटुंब त्या पत्त्यावर वास्तव्यास नाही अशी माहिती मिळाली.

 

 

 

 

सदर दोन्ही बालकाचे आई-वडील मागील दोन वर्षापासून बालकाच्या भेटीकरीता आले नसल्याने चंद्रपूर, बालकल्याण समिती बालकाला दत्तक मुक्त करणार आहे. सदर बालकाचा ताबा घेण्याकरीता बालकल्याण समिती, शास्त्रीनगर मुल रोड, चंद्रपूर 8484082224, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सिव्हिल लाईन, जिल्हा स्टेडियम जवळ, चंद्रपूर 8806488822 तसेच स्वामी विवेकानंद बालगृह, राजुरा 7620530317 या भ्रमणध्वनी क्रमांकावर सदर बालकाच्या पालकांनी 1 महिन्याच्या आत संपर्क साधावा. अन्यथा सदर बालकास दत्तक मुक्त घोषित करणार असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी कळविले आहे.

 

 

 

 

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here