*उद्या ला होणार चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांना चंद्रपूर रत्न, चंद्रपूर गौरव, चंद्रपूर भूषण, पुरस्काराने सन्मानित..*

0
82

*उद्या ला होणार चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांना चंद्रपूर रत्न, चंद्रपूर गौरव, चंद्रपूर भूषण, पुरस्काराने सन्मानित..*

 

 

दरवर्षी दिला जाणारा चंद्रपूरचा प्रतिष्ठेचा चंद्रपूररत्न, चंद्रपूर गौरव आणि चंद्रपूर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा एकूण २३ जणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण 9 फेब्रुवारी रोजी हॉटेल एनडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या पुरस्कारासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया महिनाभर सुरू होती. ज्यामध्ये 100 हून अधिक नामांकन प्राप्त झाले आणि निवड समितीने 23 नावांची निवड केली. निवडणूक प्रक्रिया आणि निवड समितीमध्ये डॉ. जयश्री कापसे, आशिष अंबाडे, अभियंता दिलीप झाडे, छत्रपती पुरस्कारप्राप्त कुंदन नायडू, संदीप कपूर, ज्योती रामावर, प्राचार्या प्रतिमा नायडू, मॉडेल नेहा खारा, शुभम गोविंदवार आणि पार्थशर समाचार चे संपादक राजेश नायडू यांचा समावेश होता. मुलांमधून नॅन्सी वाघमारे, सेजल सातपुते, कबीर सुचक आणि ध्रुव अरोरा यांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. मीनानाथ पेटकर, प्रेम जरपोतवार, राखी बोराडे यांची सामाजिक कार्यासाठी निवड करण्यात आली. डॉ.सुंदर राजदीप, भारती पजनाकर आणि अंजुम कुरेशी यांची शैक्षणिक कार्यासाठी निवड करण्यात आली. मराठी न्यूज अँकर म्हणून प्रज्ञा जीवनकर यांची तर हिंदी न्यूज अँकर म्हणून हर्षिता द्विवेदीची निवड करण्यात आली. सांस्कृतिक क्षेत्रात बकुल धवणे आणि जगदीश नांदूरकर यांची निवड झाली. नीलेश बेलखडे यांची प्रॉमिसिंग पॉलिटीशियन म्हणून, प्यार फाऊंडेशनचे देवेंद्र रापेल्ली यांची ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट म्हणून आणि माधुरी बल्की यांची योग आणि आरोग्य प्रेरक म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे अपंग क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी नीलेश पाजारे, साहित्यासाठी स्वप्नील मेश्राम आणि विशेष कलांसाठी हर्षल नेवेलकर यांची निवड करण्यात आली. तसेच जीवन गौरव पुरस्कार स्वर्गीय गजानन गावंडे गुरुजी यांना मरणोत्तर तर उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा एकमात्र चंद्रपूर भूषण पुरस्कार पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या बंडू धोत्रे यांना देण्यात आला आहे.

 

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here