भारतीय कापूस महामंडळामार्फत एफ.ए.क्यु.प्रतीच्या कापसाची किमान हमीदराने खरेदी
चंद्रपूर,दि.06: भारतीय कापूस महामंडळामार्फत जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर एफ.ए.क्यु. प्रतीच्या कापसाची किमान हमीदराने कापूस खरेदी सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, राजुरा, सोनुर्ली तसेच यवतमाळ जिल्ह्यातील खैरी, पांढरकवडा, सिंदोला, वणी अशी एकुण 8 कापूस खरेदी केंद्रे आहेत. तसेच सीसीआयमार्फत चंद्रपूर आणि वरोरा या दोन केंद्रावर किमान हमीदराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरू आहे.
तरी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक कागदपत्रांसह सीसीआय च्या नजीकच्या केंद्रावर विक्री करावा, असे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक श्री. दुहीजोड यांनी कळविले आहे.
000000