सोयाबीन खरेदीकरीता 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

0
32

सोयाबीन खरेदीकरीता 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

चंद्रपूर, दि. 22 : नाफेडतर्फे आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सन 2023-24 या हंगामात सोयाबीन खरेदीस नाफेडच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 9 नोव्हेंबर 2023 पासून सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी व खरेदीला सुरुवात झाली असून सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने सोयाबीन विक्री करता येणार आहे.

 

ही आहेत खरेदी केंद्रे :

 

यामध्ये चिमूर तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा कृषी औद्यो. सह. संस्था मर्या. चंद्रपूर, चंद्रपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, वरोरा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा, आणि राजुरा व गडचांदूर येथील कोरपना तालुका सह. खरेदी विक्री संस्था मर्या. कोरपना ही खरेदी केंद्रे आहेत, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. तिवाडे यांनी कळविले आहे.

 

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here