‘मद्यपाश एक जीव घेणारा आजार’ यावर दि. २८ जानेवारी २०२४ ला
जनजागरण सभा
अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस आपुलकी समुह, माढेळी चा उपक्रम
वरोरा –
अल्कोहोलिक्स अनॉनिमस आपुलकी समुह,माढेळी च्या वतीने स्थानिक किसान विद्यालय, माढेळी येथे ‘मद्यपाश एक जीव घेणारा आजार’ या विषयावर जनजागृती सभेचे आयोजन रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ ला करण्यात आलेले आहे.
या सभेला मार्गदर्शक म्हणून मा. श्री. ऍड. अमोल बावणे, अध्यक्ष, जन आक्रोश सामाजिक संघटना महाराष्ट्र, डॉ. हर्षल खूणकर, माढेळी, डॉ. प्रगती बजाईत, माढेळी, श्री. संदिप आगलावे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या जनजागृती सभेच्या निमित्याने आपुलकी समुहात पूर्वाश्रमीचे मद्यासक्त व आता अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस संगतीचे सदस्य असलेल्यासाठी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत वर्धापन दिन व जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात कोणती परिस्थिती व कोणकोणत्या मानसिकता परत दारूकडे नेऊ शकतात. मद्यमुक्तीनंतर येणान्या अडचणी, पैसा व आध्यात्मिकता, माझे कौटूविक संबंध तसेच व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्व या विषयावर चिंतन करण्यात येणार आहे. या सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अल्कोहोलिक्स अनॉनिमस आपुलकी समुह, माढ़ेळी यांनी केले आहे.