*घरफोडी चोर चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात…*

0
156

*घरफोडी चोर चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात…*

सदर गुन्हयातील फिर्यादी

नामें-कुणाल चौधरी रा. रामटेके वाडी जवळ ताडबन चंद्रपूर

हे परीवारासह नागपूर येथे नातेवाईकाचे विवाह कार्यकरीता दि. २४/०१/२०२४ रोजी गेले होते. दि.२५/०१/२०२४ रोजी फिर्यादी हे चंद्रपूर येथे राहते घरी परत आले असता घराचे मुख्य दरवाज्याचे कडी तुटलेली दिसली तसेच घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमधील आई व वहिणीचे सोने व चांदीचे दागिने दिसुन आले नाही. फिर्यादी यांचे अनुउपस्थितीमध्ये दि.२४/०१/२०२४ रोजीचे रात्री कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे दरवाज्याची कड़ी तोडुन घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे लॉकरमधील सोने व चांदीचे दागिने कि.२.२७,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेलेबाबत दिलेल्या तकारीवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर गु.र.नं – ५९/२०२४ कलम ४५७,३८० भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

सदर गुन्ह्याच्या तपासात अज्ञात आरोपीचा शोध घेत असता दि. 25/01/2024 रोजी गुन्हे शोध पथकातील अधिकारी अमलदार यांनी गोपनीय बातमीदार व CCTV फुटेज व मोबाईल क्रमांकाचे तांत्रीक विश्लेशन करून पोस्टे रेकॉर्ड वरील आरोपी नामे जाहेद उर्फ जावेद कदीर शेख वय 28 वर्ष, राह. अंचलेश्वर वार्ड चंद्रपुर जि. चंद्रपुर यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अपराध क. 59/24 कलम 457,380 भादवि गुन्हया सबंधाने विचारपुस केली असता आरोपीने कबुली देवुन घटनेवेळी माझे सोबत आरोपी नामे वैभव राजेश डोंगरे वय 24 वर्षे रा. इंदीरा नगर चंद्रपुर याचेसह हाजर असल्याचे सांगीतले. आरोपीने गुन्हा कबुल केल्याने आरोपी कडुन एक सोन्याची बोरमाळ वजन १३.३०० ग्रॅम कि.५६,५००/-रू जप्त करण्यात आली. दि. २६/०१/२४ रोजी आरोपी जाहेद शेख यास मा कोर्टा समोर हजर करून दि.२९/०४/२४ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. पो.क. रिमांड कालावधी मध्ये आरोपी जाहेद शेख याने दि.२६/०१/२०२४ रोजी भा.पु.का कलम २७ प्रमाणे दिलेल्या निवेदनानुसार गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे काळी मणी असलेले मंगळसुत्र, सोन्याचे कानातील टॉप्स ४ नग वजन ३.८०० ग्रॅम कि. १९,०००/-रू, दोन सोन्याचे लॉकेट जिवती वजन १.४५० ग्रॅम कि.७२५०/-रू, एक सोन्याचा तुकडा वजन १ ग्रॅम कि.५०००/-रू, रोख रूपये १३,७२०/-रू व गुन्हयात वापरलेली मोटरसायकल ६०,०००/- रू व चांदीचे दागीने अंदाजे वनज ६० तोळे किंमत ३०,०००/-रू अशा एकुण २,०७,४७०/-रू किमतीच्या वस्तु जप्त करण्यात आल्या आहे. तसेच आरोपीने तपसादरम्यान पोस्ट हद्दीत व चंद्रपुर जिल्हयात इतर ठिकाणी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

 

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री रविंदसिंग परदेशी सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर नंदनवार सा. यांचा मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री सतिशसिंह राजपुत सा.. यांचे नेतृत्वात गुन्हेशोध पथकातील स.पो.नि. मंगेश भोंगाडे सा. पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनी शरीफ शेख सा. सफौ. विलास निकोडे/१९०४, पोहवा महेंद्र बेसरकर / ३५, जयंता चुनारकर / ८९८, संतोष पंडीत/२४, सचिन बोरकर/२३००, निलेश मुळे/९१७ नापोशि चेतन गज्जलवार/१२२७ इमराना /२५४२ रूपेश रणदिवे/११४४, दिलीप कुसराम/२५९९, इर्शाद खान/१६२, संतोष कावडे /५०७ रूपेश पराते /०८ शाबाज/९१७, मंगेश/२७८५ मपोहवा भावना / २३२४ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here